पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान येत्या 29 डिसेंबरला न्यू पूर्वेकडील समर्पित मालवाहतूक मार्गाच्या न्यू भाऊपूर- न्यू खुर्जा विभागाचे आणि कार्य नियंत्रण केंद्राचे उद्घाटन करणार

Posted On: 27 DEC 2020 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 डिसेंबरला सकाळी 11वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे  पूर्वेकडील समर्पित मालवाहतूक कॉरीडॉरच्या न्यू भाऊपूर-न्यू खुर्जा विभागाचे (EDFC) उद्घाटन करणार आहेत. या समारंभाच्या दरम्यान पंतप्रधान प्रयागराज येथील या कॉरीडॉरच्या कार्य नियंत्रण केंद्राचे (OCC) देखील उद्घाटन करणार आहेत. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे ही या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

ईडीएफसीचा 351 किलोमीटर लांबीचा न्यू भाऊपूर ते न्यू खुर्जा विभागाचा हा मार्ग उत्तर प्रदेश राज्यात असून तो बांधण्यासाठी 5,750 कोटी रुपये खर्च आला आहे. या विभागामुळे येथील स्थानिक उद्योगांना, उदाहरणार्थ अल्युमिनियम उद्योग, दुग्धव्यवसाय (ऑरैया जिल्हा), वस्त्र उत्पादन /ब्लॉक प्रिंटींग (ईटावा जिल्हा), काचसामान उद्योग (फिरोझाबाद जिल्हा), मातीची उत्पादने, कुंभारकाम (बुलंद शहरातील खुर्जा विभाग), हिंग उत्पादन (हाथरस जिल्हा) कुलूप आणि हार्ड वेअर (अलिगढ जिल्हा) अशा क्षेत्रात नव्या संधी  उपलब्ध करेल. कानपूर दिल्ली मार्गावरील मुख्य मार्गावरील वाहतुकीचे  नियमन सुसाध्य करेल आणि भारतीय रेल्वेला आपल्या गाड्या वेगवान रीतीने धावण्यासाठी सहाय्यक ठरेल. 

प्रयागराज येथील अत्याधुनिक कार्य नियंत्रण केंद्र ईडीएफसीच्या संपूर्ण लांबीच्या मार्गासाठी नियंत्रण करण्याचे काम करेल. हे नियंत्रण केंद्र (OCC), आतील आधुनिक रचना, उत्तम ध्वनी संयोजनाची व्यवस्था यांनी सुसज्ज बनवले आहे. अशा पध्दतीची  रचना असलेले हे या प्रकारचे जगातील सर्वात भव्य केंद्र आहे. याची इमारत पर्यावरण अनुकूल अशी हरीत इमारत असून त्याला  GRIHA4 चा दर्जा मिळाला असून ती  सुगम्य भारत अभियानाच्या निकषांनुसार बांधली आहे.

 

ईस्टर्न डेडिकेटेड फ्रंट कॉरीडॉर  बद्दल:

ईडीएफसी मार्ग (1856 किलोमीटर मार्ग) साहनेवाल, लुधियाना (पंजाब) येथून सुरू होत असून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, आणि झारखंड या राज्यांतून जात पश्चिम बंगालमधील डान्कुनी येथे संपतो. हा मार्ग डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) या कंपनीच्या मार्फत बांधला जात आहे, जी अशा प्रकारचे समर्पित मालवाहतूक मार्ग तयार करण्याच्या  आणि चालविण्याच्या उद्देशाने तयार केलेली विशेष संस्था आहे. डीएफसीसीआयएल ही कंपनी  पश्चिम विभागात आणखी मार्ग (1504 किलोमीटर) बांधत आहे जो उत्तरप्रदेशातील दादरी या ठिकाणाला  मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणारा असून तो उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून जाईल.

 

* * *

G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684010) Visitor Counter : 99