आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील कोविड–19 ची सक्रिय रुग्णसंख्या आणखी 3.05 लाखांनी घटली
Posted On:
20 DEC 2020 3:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2020
भारताचा कोविड – 19 च्या सक्रिय रुग्णांचा उतरता आलेख सातत्याने घसरत आहे. एकूण सक्रिय रुग्णसंख्या आज 3.05 लाखांपर्यंत (3,05,344) खाली आली आहे. भारतातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 3.04 टक्के इतकी भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या आहे. गेल्या 24 तासांत 29,690 नवीन रुग्ण बरे झाल्यामुळे एकण सक्रिय रुग्णसंख्येत 3,407 ची घट झाली आहे.
दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या गेल्या 24 तासांत 26,624 इतकी झाली आहे. गेल्या 21 दिवसांपासून सातत्याने दररोज नवीन रुग्णसंख्या 40,000 पेक्षा कमी आहे.
एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास 96 लाख (9,580,402) इतकी आहे.
केरळमध्ये एका दिवशी सर्वाधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे, नव्याने बरे झालेली रुग्णसंख्या 4,749 इतकी आहे. महाराष्ट्रात 3,119 लोक बरे झाले आहेत.
केरळमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येचा 6,293 इतका उच्चांक आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 3,940 इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 341 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक (74) मृत्यू नोंदविण्यात आले.
* * *
S.Thakur/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682200)
Visitor Counter : 169
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam