आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत आणखी घसरण, बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 52 हजारावर आली; रुग्णसंख्येचा गेल्या 149 दिवसांनंतरचा नीचांक
प्रतिदिन रोगमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण रोज नव्याने नोंदल्या जाणाऱ्या बाधितांपेक्षा गेले 17 दिवस सातत्याने जास्त
कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 93 लाख 88 हजार, रोगमुक्तीचा दर 95% च्या जवळपास पोचला
Posted On:
14 DEC 2020 12:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2020
भारतात आजघडीला 3,52,586 कोविड बाधित रुग्ण आहेत. ही संख्या आतापर्यंत बाधित झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येच्या 3.57% आहे. हा गेल्या 149 दिवसांनंतरचा नीचांक आहे. यापूर्वी 18 जुलै 2020 ला तोपर्यंतची सर्वात कमी म्हणजे 3,58,692 सक्रीय कोविड बाधितांची नोंद झाली होती.
प्रतिदिन रोगमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण रोज नोंदल्या जाणाऱ्या नवीन बाधीतांपेक्षा जास्त असल्यामुळे सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत खात्रीशीर घट दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत एकूण रुग्णसंख्येत 3,960 रुग्णांची घट नोंदली गेली.
देशभरात गेल्या 24 तासांत 27,071 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 30,695 रुग्ण कोविड मुक्त झाले. रोज रोगमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या बाधितांपेक्षा गेले 17 दिवस सातत्याने जास्त आहे.
आतापर्यंत कोविड संसर्गातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या 94 लाखांच्या आसपास म्हणजे 93,88,159 वर पोचल्याने रोगमुक्तीचा दर तब्बल 94.98% झाला आहे. रोगमुक्त झालेले आणि सध्या बाधित असणारे यांच्या संख्येतील तफावत सातत्याने वाढत असून सध्या ती 90,35,573 इतकी आहे.
नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी 75.58% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
केरळमध्ये एका दिवसांत रोगमुक्त झालेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 5,258 इतकी असून त्याखालोखाल महाराष्ट्रात 3,083 रुग्ण कोविड मधून बरे झाले तर पश्चिम बंगालमध्ये आणखी 2,994 नव्या रोगमुक्तांची नोंद झाली आहे.
नोंद झालेल्या नव्या कोविड बाधितांपैकी 75.82% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकवटलेले आहेत.
केरळमध्ये गेल्या 24 तासांत सर्वात जास्त म्हणजे 4,698 व्यक्ती नव्याने कोविड बाधित झाल्याची नोंद झाली, महाराष्ट्रात काल 3,717 तर त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 2,580 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशात गेल्या 24 तासांत कोविडमुळे मृत्यू पावलेल्या 336 रुग्णांपैकी 79.46% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील होते.
या काळात, एकूण मृत्यू पावलेल्यांपैकी 20.83% म्हणजे 70 रुग्ण महाराष्ट्रातील होते. पश्चिम बंगालमध्ये 47 आणि दिल्लीत 33 रुग्णांचा काल कोविडमुळे मृत्यू झाला.
* * *
U.Ujgare/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680510)
Visitor Counter : 115
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam