पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा 15 डिसेंबर रोजी कच्छ दौरा आणि विविध विकासकामाच्या प्रकल्पांचा होणार भूमिपूजन समारंभ
Posted On:
13 DEC 2020 8:08PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 डिसेंबर 2020 रोजी गुजरातच्या कच्छमधील ढोरडो येथे भेट देणार आहेत, आणि राज्यातील काही विकास कामांची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांसह पृथक्करण प्रकल्प, संकरित अक्षय ऊर्जा प्रकल्प, आणि पूर्णतः स्वयंचलित दूध प्रक्रिया आणि पॅकिंग प्रकल्प यांचा समावेश आहे. गुजरातचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान सफेद रण येथे (White Rann) देखील भेट देणार आहेत, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
विशाल किनारपट्टीचा उपयोग करून घेत, कच्छ मधील मांडवी येथे, आगामी पृथक्करण पद्धतीतून (डिसेलिनेशन प्लांट) खाऱ्यापाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्यापर्यंतचा लक्षणीय टप्पा गुजरात ओलांडत आहे. हा पृथक्करण प्रकल्प, प्रतिदिन 10 कोटी लीटर क्षमतेचा (100 एमएलडी) आहे, नर्मदा खोऱ्याला पूरक असलेल्या गुजरातमधील जलसुरक्षेला, साऊनी जाळ्याला आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला बळकटी देईल. देशातील शाश्वत आणि परवडणाऱ्या जलसंपदा उपसा प्रकल्पातील हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. या संपूर्ण प्रदेशातील मुंद्रा, लखपत, अब्दासा आणि नखत्राना तालुक्यातील जवळपास 8 लाख लोकांना या प्रकल्पातून पृथक्करण केलेले पाणी मिळू शकेल, जे भचाऊ, रापर आणि गांधीधाम या प्रवाहाविरुद्ध असलेल्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाणी वाटून घेण्यास देखील मदत करेल. गुजरातमधील आगामी दहेज (100 एमएलडी), द्वारका (70 एमएलडी), घोघा भावनगर (70 एमएलडी) आणि गिर सोमनाथ (30 एमएलडी) या पाच प्रकल्पांव्यतिरिक्त हा एक प्रकल्प आहे.
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील विघकोट गावाजवळील संकरित अक्षय ऊर्जा प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा 30 गेगावॅट क्षमतेचा अक्षय ऊर्जा प्रकल्प होणार आहे. 72,600 हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारलेला, हा प्रकल्प पूर्णतः संकरित प्रकल्प क्षेत्र हे पवन आणि सौर ऊर्जेच्या साठवणुकीसाठी समर्पित तसेच पवन उद्यानातील उपक्रमांसाठी विशेष विभाग असेल.
कच्छ मधील अंजार येथे सरहद डेअरीतील पूर्णतः स्वयंचलित दूध प्रक्रिया आणि पॅकिंग प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 121 कोटी रुपये किंमतीचा हा प्रकल्प आहे आणि प्रतिदिन 2 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची त्याची क्षमता आहे.
.....
S.Thakur/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680436)
Visitor Counter : 129
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada