पंतप्रधान कार्यालय
फिक्कीच्या, 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या 93 व्या सर्वसाधारण सभेत आणि वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
10 DEC 2020 8:36PM by PIB Mumbai
फिक्कीची 93 वा वी सर्वसाधारण सभा आणि वार्षिक संमेलन येत्या 12 डिसेंबरला होणार असून त्याच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे भाषण होणार आहे. यावेळी, पंतप्रधानांच्या हस्ते फिक्कीच्या वार्षिक प्रदर्शन 2020 चे उद्घाटन होणार आहे.
फिक्कीचे हे वार्षिक संमेलन 11, 12 आणि 14 डिसेंबरला होणार आहे. यंदाच्या वर्षिक संमेलनाची संकल्पना ‘प्रेरित भारत’ ही आहे. या कार्यक्रमात अनेक मंत्री, सनदी अधिकारी, उद्योगक्षेत्रातील धुरीण, राजनैतिक अधिकारी,आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि इतर मान्यवर सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या संमेलनात, विविध मान्यवर अर्थव्यवस्थेवर कोविडच्या झालेल्या परिणामांविषयी तसेच सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणा आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या भवितव्याविषयी मार्गदर्शन आणि चर्चा करतील.
फिक्कीचे वर्षिक प्रदर्शन उद्या, म्हणजेच 11 डिसेंबर पासून सुरु होईल आणि ते पुढचे वर्षभर सुरु राहील. या आभासी प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध उद्योग-व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनांचे ऑनलाईन स्वरूपात जागतिक प्रदर्शन करण्याची आणि त्याद्वारे व्यवसाय वाढविण्याची संधी मिळेल.
****
M.Chopade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679803)
Visitor Counter : 138
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam