पंतप्रधान कार्यालय

बुरेवी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद

प्रविष्टि तिथि: 02 DEC 2020 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  2 डिसेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुरेवी चक्रीवादळामुळे तामीळनाडूच्या काही भागात उद्‌भवलेल्या परिस्थितीबद्दल तामीळनाडूचे मुख्यमंत्री थिरु एडप्पादी के पलानीस्वामी यांच्याशी संवाद साधला.

ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, तामीळनाडूचे मुख्यमंत्री  थिरु @EPSTamilNadu Ji  यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. बुरेवी चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागातील परिस्थितीविषयी आम्ही चर्चा केली. केंद्र सरकार तामीळनाडूला शक्य ते सर्व सहकार्य करेल. चक्रीवादळ प्रभावित भागात राहणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो.

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1677814) आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam