विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोरोना विषाणू निदानासाठी CSIR-CCMB कडून विकसित ड्राय स्वॅबचा नमुना  वापरून  RT-PCR करण्याच्या पद्धतीला ICMRची मंजूरी


अतिरिक्त संसाधनाशिवाय  या परिक्षणाच्या आधारे दोन ते तीन पट अधिक संख्येने चाचण्या शक्य

Posted On: 28 NOV 2020 6:00PM by PIB Mumbai

 

CSIRच्या हैदराबाद येथील कॉन्स्टिट्युअंट लॅब सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने कोरोना SARS-CoV-2 विषाणू निदान करण्यासाठी ड्राय स्वॅबचा नमुना  वापरून  RT-PCR करण्याची सोपी पद्धत विकसित केली आहे.  या पद्धतीला अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) आपल्या स्वतंत्र प्रमाणीकरणानुसार मान्यता दिली आहे.

 CSIR-CCMB ने विकसित केलेल्या या पद्धतीत सध्याच्या सर्वमान्य रूढ RT-PCR पद्धतीत  किंचित बदल केला आहे आणि त्यामुळे सध्याच्या संसाधनांवर कोणतीही नवी गुंतवणूक न करताही आधीपेक्षा दोन ते तीन पट अधिक संख्येने चाचण्या होऊ शकतील. या पद्धतीचे संपूर्ण मुल्यांकन केल्यावर व तीवर 96.9 टक्के एकमत झाल्यानंतर ICMR ने CSIR-CCMB च्या ड्राय स्वॅब पद्धतीचा परिक्षणासाठी वापर करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. ही पद्धत कमी खर्चाची आणि कमी कालावधीत निदान देणारी आहे.

Figure 1:   ड्राय स्वॅब नमुना आणि परिक्षणासाठीचे अभिकर्म द्रव हे परिक्षणासाठी परिक्षानळीत घेतले.

Figure 2: कोरोनो विषाणू विलगीकरणाविना ड्राय स्वॅब RNA  नमुन्याचे परिक्षण 

 

हैदराबाद येथील CSIR-CCMB संस्था एप्रिल 2020 पासून कोरोनोविषाणू परिक्षण करत आहेत. तेलंगणामधील आरोग्यरक्षकांसह काम केल्यानंतर परिक्षणाचा वेग कमी करण्यासाठी कारणाभूत असलेल्या काही महत्वाच्या बाबी लक्षात आल्या. यावर प्रतिक्रिया म्हणून संशोधकांनी कोविड-19 विषाणू शोधण्यासाठी RNA विलगीकरणाविना ड्राय स्वॅब नमुना परिक्षण पद्धत  विकसित केली.

 

ड्राय स्वॅब- थेट RT-PCR पद्धतीबद्दल अधिक नेमकेपणाने मांडायचे झाल्यास , कोरडा नासिका द्रव जमा करून तो कोरड्या स्थितीतच परीक्षणाच्या उपकरणापर्यंत नेणे याचा अंतर्भाव आहे.  परिक्षण नमुना जमा करणे व परीक्षणाच्या उपकरणापर्यंत नेणे  यासाठी विषाणू वाहतूक माध्यम (Viral transport medium- VTM) वापरणे अनिवार्य असलेल्या आधीच्या पद्धतीपेक्षा या पद्धतीत नमुन्याची हाताळणी आणि वहन सुलभ होते तसेच नमुन्याची गळती आणि त्याद्वारे संसर्ग पसरणे हे धोके टाळता येतात.

दुसरी बाब म्हणजे नमुन्यापासून RNA विलग करण्याची पायरी टाळली जाते आणि ICMR चे परिक्षण संच वापरून नमुन्याची थेट RT-PCR  करता येते.  RNA विभाजन हे  वेळ, खर्च आणि प्रशिक्षित मनुष्यबळ याच्याशी निगडीत असल्याने ती पायरी वगळल्यामुळे रूढ पद्धतीपेक्षा ही पद्धत जास्त फायदेशीर आहे. याशिवाय रुढ संसाधने  वापरून व जास्तीचा खर्च न करता  नमूना परिक्षण होते तसेच परिक्षणांच्या संख्यामध्ये दोन ते तीन पट वाढ करता येउ शकते.

ड़ॉ शेखर मांडे, DG-CSIR यांनी या प्रगतीवर भाष्य करताना सांगितले की  ड्राय स्वॅबचा नमुना  वापरून  RT-PCR पद्धत ही खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर, नवीन संचाची आवश्य़कता नसल्याने सुलभ आणि उपलब्ध मनुष्यबळ कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय  करता येणारी आहे. आणि म्हणूनच देशाची निदान चाचणी संख्या वाढवण्यासाठी ती महत्वाचे योगदान देऊ  शकते.

CCMB चे संचालक राकेश मिश्रा म्हणाले अगदी स्वयंचलित पद्धतीनेही RNA विलग करण्याच्या प्रक्रियेला साधारण 500 नमुन्यांना 4 तास एवढा कालावधी लागतो.  VTM  (विषाणू वाहक द्रव) आणि RNA विलगीकरण  दोहोंमुळे मोठ्या प्रमाणावरील चाचण्या करताना खर्च आणि कार्यकाल दोन्ही वाढतात.  या नवीन पद्धतीच्या  गुणवत्तेमुळे सर्व काही साध्य होत आहे तसेच यासाठीचा खर्चही कमी होईल  व परिक्षणाला लागणारा वेळही 40 ते 50% नी कमी होईल.

CSIR-CCMB च्या  सुधारित पद्धतीला अनेक मान्यवर संस्था आणि रुग्णालये यांनी दुजोरा दिला आहे. त्यामध्ये सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रीट्स आणि डायग्नोसिस (CDFD), IISCR बेहरामपूर, CSIR-NEERI, GMCH – नागपूर, पुण्यातील   जीनपाथ, IGGMSH and MAFSU – नागपूर आणि हैदराबाद येथील अपोलो रुग्णालय यांचा समावेश आहे.  याशिवाय ही सुधारित पद्धती CSIR-CCMB च्या आंतरवाचनासाठी असलेल्या गृह जर्नलमध्ये तसेच विविध प्रतिष्ठित शास्रीय नियतकालिकात  प्रसिद्ध झाली आहे.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1676772) Visitor Counter : 157