पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याशी साधला संवाद

Posted On: 27 NOV 2020 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्‍हेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

उभय नेत्यांनी कोविड-19 साथीच्या आजारामुळे  उद्भवलेल्या आव्हानांबद्दल चर्चा केली आणि लस विकास आणि उत्पादन क्षेत्रात भारत आणि ब्रिटन यांच्यात होणाऱ्या आश्वासक सहकार्याचा आढावा घेतला.

ब्रेग्झिटनंतर तसेच कोविड-नंतरच्या काळात भारत-ब्रिटन भागीदारीला उत्तुंग झेप देण्याच्या आपल्या इच्छेचा उभय नेत्यांनी पुनरुच्चार केला आणि  व्यापार आणि गुंतवणूक,  वैज्ञानिक संशोधन, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची गतिशीलता आणि संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रात   सहयोग वृद्धिंगत करण्याची प्रचंड क्षमता असल्याबाबत सहमती दर्शविली.

हवामान बदलाविरूद्धच्या लढाईत भारत आणि ब्रिटन यांच्यातील सहकार्यावर उभय नेत्यांनी  विशेष भर दिला आणि आंतरराष्ट्रीय सौर युती आणि आपत्ती निवारण यंत्रणेसारख्या व्यासपीठा अंतर्गत परस्परांच्या  सहकार्याचे कौतुक केले.

भारत-ब्रिटन भागीदारीसाठी महत्त्वाकांक्षी दीर्घकालीन पथदर्शक आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी दोन्ही देशांचे अधिकारी आपले कार्य सुरु ठेवतील यावर उभय देशांनी सहमती दर्शविली.

 

* * *

Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1676604) Visitor Counter : 207