ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
एनएफएसए-अन्न व सार्वजनिक वितरण विभागांतर्गत योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता 2013 पासून 4.39 कोटी बोगस रेशन कार्डाचे निराकरण
रद्द झालेल्या रेशनकार्डच्या बदल्यात खऱ्या आणि योग्य पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे नवीन कार्डे
Posted On:
06 NOV 2020 1:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2020
एनएफएसए-अन्न व सार्वजनिक वितरण विभागांतर्गत योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता 2013 पासून आतापर्यंत राज्य/केंद्रशासित प्रदेशाकडून 4.39 कोटी बोगस रेशन कार्डाचे निराकरण करण्यात आले आहेत. तंत्रज्ञानावर आधारित सुधारणांचा भाग म्हणून देशभरात सार्वजनिक वितरण प्रणाली (टीपीडीएस) चे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि रेशन कार्ड्स / लाभार्थी डेटाबेस, आधार सीडिंग, अपात्र / बोगस रेशन कार्डे शोधून पारदर्शकता व कार्यक्षमता सुधारण्यात येत आहे.
एनपीएसए 81.35 कोटी लोकांना टीपीडीएसद्वारे अनुदानित धान्य उपलब्ध करते, जे 2011 च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येच्या जवळजवळ दोन तृतीयांश आहे. सध्या देशातील 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना धान्य (तांदूळ, गहू, भरड धान्य) मिळत आहेत. दर महिन्याला प्रति किलो 3, 2 आणि 1 रुपये या दराने तांदूळ, गहू आणि भरड धान्य एनएफएसए अंतर्गत उपलब्ध होत आहे.
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670590)
Visitor Counter : 124
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada