संरक्षण मंत्रालय

एरो-इंडिया 2021 ला भेट देण्यास इच्छुक माध्यम प्रतिनिधींसाठी आजपासून नोंदणी सुरू

Posted On: 02 NOV 2020 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020

13 वे ‘एरो इंडिया 2021’ प्रदर्शन येलाहंका, बेंगळुरू (कर्नाटक) येथे 3 ते 7 फेब्रुवारी 2021 दरम्यान भरणार आहे.

या प्रदर्शनाला भेट देऊ इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींसाठी आजपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. एरो इंडियाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणी करता येईल, तसेच नोंदणीचा कालावधी 06 डिसेंबर 2020 पर्यंतच आहे. माध्यम प्रतिनिधींना नोंदणी शुल्क नाही, मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या परदेशी माध्यम प्रतिनिधींकडे वैध ‘J-व्हिसा’ असणे अनिवार्य आहे.

https://aeroindia.gov.in/media/mediaregcontent  या संकेतस्थळावर माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीसाठी विशेष बटन आहे आणि त्यासोबतच वैध माध्यम कार्ड नं, पत्रसूचना कार्यालय/राज्ये यांचे (मान्यता असल्यास) मान्यताप्राप्त ओळखपत्राचा क्रमांक, सरकारकडून प्राप्त छायाचित्रित ओळखपत्र आणि 512 केबीहून कमी साईजचे ओळखपत्र देणे आवश्यक आहे.

हा पाच दिवसांच्या कार्यक्रम म्हणजे मुख्यत्वे एअरोस्पेस आणि संरक्षण व्यवसायासंबधी व्यापारी प्रदर्शन आहे. याशिवाय एरोस्पेस उद्योगातील महत्वाचे उद्योजक आणि जागतिक स्तरावरील प्रमुख व्यक्ती यांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमातील चर्चेत जगातील अनेक नामवंत व्यक्ती सामील होतील. विमानचालन उद्योगाला माहिती, कल्पना आणि नवविकास यांचे आदानप्रदान करण्यासाठी एरो इंडिया ही उत्कृष्ट, एकमेवाद्वितीय संधी आहे.  एरो इंडिया हे अंतर्गत हवाई प्रवासाला चालना देण्यासोबतच  ‘मेक इन इंडिया’ ला प्रोत्साहन देणारे ठरेल.

जवळपास 500 भारतीय आणि परदेशी कंपन्या या प्रदर्शनात भाग घेतील असा अंदाज आहे.

 

M.Iyengar/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669499) Visitor Counter : 164