पंतप्रधान कार्यालय

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

Posted On: 29 OCT 2020 5:08PM by PIB Mumbai

 

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की, “आमचे प्रिय आणि आदरणीय केशुभाई यांचे निधन झाले, याचा मला फारच धक्का बसला आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी काम करणारे ते एक प्रख्यात राजकीय नेता होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गुजरातच्या विकासासाठी आणि प्रत्येक गुजरातीच्या सक्षमीकरणासाठी वाहिले.

जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाला बळकट करण्यासाठी केशुभाईंनी संपूर्ण गुजरातचा प्रवास केला आणि आणीबाणीला कडाडून विरोध केला. ते शेतकर्‍यांशी संबंधित प्रश्नांबाबत नेहमीच संवेदनशील असत, मग ते आमदार, खासदार, मंत्री असोत की मुख्यमंत्री असोत, त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आणि त्यांची अंमलबजावणीही केली.

केशुभाई माझ्यासह इतर तरूण कार्यकर्त्यांसाठी विश्वासू मार्गदर्शक ठरले. प्रत्येकाला त्याचा प्रेमळ स्वभाव खूप आवडत असे. त्याचा मृत्यूने एक पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून निघणार नाही आणि आज त्यांच्या निधनाने आपण सर्वजण दु: खी आहोत. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि हितचिंतकांच्या दुःखात सहभागी आहे. मी त्यांचा मुलगा भरत यांच्याशी बोलून माझ्या भावना व्यक्त केल्या. ओम शांती. "

Our beloved and respected Keshubhai has passed away…I am deeply pained and saddened. He was an outstanding leader who cared for every section of society. His life was devoted towards the progress of Gujarat and the empowerment of every Gujarati. pic.twitter.com/pmahHWetIX

— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2020

****

B.Gokhale/ S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1668460) Visitor Counter : 154