आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात 22 मार्च पासूनचा सर्वात कमी मृत्यू दर
गेल्या 24 तासात 500 हून कमी मृत्यूंची नोंद
14 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात 1 % पेक्षा कमी मृत्यू दर
Posted On:
26 OCT 2020 2:19PM by PIB Mumbai
रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनासाठी केंद्र, राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या लक्ष्य केंद्री प्रयत्नामुळे भारतातला मृत्यू दर 1.5 % झाला आहे. प्रतिबंधासाठी प्रभावी रणनीती, मोठ्या प्रमाणात चाचण्या,सरकारी आणि खाजगी रुग्णालयात प्रमाणित मानक वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे मृत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे.
देशात गेल्या 24 तासात 500 हून कमी (480) मृत्यूंची नोंद झाली आहे.
जगभरात कमी मृत्यू दर असलेल्या देशांपैकी भारत एक असून 22 मार्च पासून मृत्यू दर कमी असून त्यात सातत्याने घट होत आहे.
कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसाद धोरणाचा एक भाग म्हणून कोविडला प्रतिबंध करण्याबरोबरच गंभीर आजारी रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवून मृत्यू दर कमी करण्यावरही केंद्र सरकारचा भर राहिला आहे. केंद्र आणि राज्य/ केंद्र शासित प्रदेशांच्या समन्वित प्रयत्नातून देशभरात आरोग्य सुविधा बळकट झाल्या आहेत. 2218 कोविड समर्पित रुग्णालये दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.
वैद्यकीय व्यवस्थापनात आयसीयु डॉक्टरांच्या क्षमता वृद्धीसाठी नवी दिल्लीतल्या एम्सने ई- आयसीयु हा आगळा उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवार आणि शुक्रवार अशा आठवड्यातल्या दोन वारी राज्य रुग्णालयातल्या आयसीयु मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्ससाठी तज्ञाकडून टेली/ व्हिडीओ सल्ला सत्रे आयोजित करण्यात येतात. 8 जुलै 2020पासून ही चर्चा सत्रे आयोजित करण्यात येत आहेत. आतापर्यंत 25 टेली सत्रे आयोजित करण्यात आली असून 34 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातल्या 393 संस्था यात सहभागी झाल्या आहेत.
गंभीर रुग्णांच्या उपचारासंदर्भात डॉक्टरांची आयसीयू/ वैद्यकीय व्यवस्थापन क्षमता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी नवी दिल्लीतल्या एम्सने, आरोग्य मंत्रालयाच्या समन्वयाने ‘वारंवार विचारले जाणारे प्रश्न’ विकसित केले असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती उपलब्ध आहे. ही माहिती इथे पाहता येईल- https://www.mohfw.gov.in/pdf/AIIMSeICUsFAQs01SEP.pdf
कोरोनाचा संसर्ग लवकर होण्याचा धोका असलेल्या वृध्द,गरोदर महिला आणि विविध आजार असलेल्या व्यक्तीबाबत माहिती घेण्यासाठी अनेक राज्य सरकारांनी यासंदर्भात लोकसंख्या सर्वेक्षण केले. मोबाईल ऐप यासारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने, जास्त धोका असलेल्या अशा लोकांच्या प्रकृतीबाबत लक्ष ठेवणे सुनिश्चित होऊन आजार वेळीच ओळखणे, तत्पर वैद्यकीय उपचार होऊन मृत्यू दर कमी होण्यासाठी मदत झाली आहे. स्थलांतरित लोकांचे व्यवस्थापन आणि सामाजिक स्तरावर जन जागृती करण्यासाठी आशा सेविका आणि एएनएम यांची कामगिरी प्रशंसनीय आहे.
परिणामी 14 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर 1 % पेक्षा कमी आहे.
देशात गेल्या 24 तासात 59,105 रुग्ण कोरोनातून बरे झाले तर 45,148 नव्या रुग्णांची नोंद झाली.यामुळे बरे झालेल्यांची संख्या 71लाखाहून अधिक (71,37,228) झाली आहे. एका दिवसात बरे होणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर सातत्याने वाढत असून हा दर वाढून 90.23% झाला आहे.
सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होण्याचा कल भारताने कायम राखला आहे. सध्या सक्रीय रुग्ण हे देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 8.26% असून ही संख्या 6,53,717 आहे. 13 ऑगस्ट पासून ही सर्वात कमी संख्या असून त्या दिवशी ही संख्या 6,53,622 होती.
नव्याने बरे झालेल्यांपैकी 78 % व्यक्ती 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आहेत.
कर्नाटकात एका दिवसात 10,000 जास्त जण कोरोनातून बरे झाले. केरळमध्ये ही संख्या 7,000 पेक्षा जास्त आहे.
गेल्या 24 तासात 45,148 नव्या रुग्णांची नोंद झाली. 22 जुलै पासून ही सर्वात कमी संख्या आहे, 22 जुलैला ही संख्या 37,000 होती.
नव्या रुग्णांपैकी 82% रुग्ण 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आहेत. केरळ आणि महाराष्ट्र मध्ये नव्या रुग्णांची संख्या जास्त असून या राज्यांमध्ये प्रत्येकी 6,000 पेक्षा जास्त नविन रुग्ण आहेत, त्यानंतर कर्नाटक, दिल्ली आणि पश्चिम बंगाल मध्ये 4,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
गेल्या 24 तासात 690 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सुमारे 81% मृत्यू 10 दहा राज्ये/केंद्र शासित प्रदेशातले आहेत.
गेल्या 24 तासात 480 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सुमारे 80% मृत्यू 10 दहा राज्ये/केंद्र शासित प्रदेशातले आहेत.
यापैकी 23% पेक्षा जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. (112 मृत्यू )
U.Ujgare/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667560)
Visitor Counter : 973
Read this release in:
Odia
,
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam