Posted On:
23 OCT 2020 4:44PM by PIB Mumbai
नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने,राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ, एनटीपीसीला, मध्य प्रदेशातल्या विंध्याचल सुपर औष्णिक उर्जा केंद्र आणि गाडरवारा सुपर औष्णिक उर्जा प्लांट तर छत्तीसगडमधल्या सिपत सुपर औष्णिक उर्जा प्रकल्पासाठी संशोधन आणि तपासणीकरिता रीमोटली पायोलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम आरपीएएस तैनात करण्यासाठी सशर्त सूट दिली आहे.
एनटीपीसी या ड्रोनचा या तीन स्थळांसाठी भौगोलिक मॅपिंग, हवाई पाहणी आणि इतर संबंधित कामासाठी उपयोग करेल.यामुळे एनटीपीसीला कमी खर्चात अतिशय अचूक माहिती मिळेल असा विश्वास नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सह सचिव अंबर दुबे यांनी व्यक्त केला आहे.पायाभूत,खाणकाम,कृषी आणि आपत्कालीन मदत यासारख्या क्षेत्रात औद्योगिक ड्रोनच्या उपयोगाला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना अनुसरून ही सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
31 डिसेंबर 2020 किंवा डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म पूर्णपणे कार्यान्वित होई पर्यंत यापैकी जे आधी होईल तोपर्यंत ही सशर्त सूट लागू राहील.
यासाठीच्या अटी आणि निर्बंध याप्रमाणे आहेत-
- सीएआर विभाग 3 शृंखला X भाग I, च्या संबंधित तरतुदीतून एनटीपीसीला दिलेली ही सूट हवाई वाहतूक मंत्रालयाच्या विमान नियमावली 1937 च्या नियम 15 ए मधल्या सवलतीच्या अधीन आहे.
- एनटीपीसी, स्थानिक प्रशासन, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, भारतीय विमान प्राधिकरण यांच्याकडून आरपीएएस कार्यान्वयन सुरु करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेईल.
- एनटीपीसी, जारी करण्यात आलेल्या वैध ड्रोन स्वीकृती क्रमांकासह (म्हणजेच D1DXOOS1T आणि D1DXOOS24 करिता NETRA PRO of M/s ldeaForge Technology Pvt Ltd). केवळ केंद्र सरकारला माहिती दिलेली आरपीएएस सुरु करेल.
- डीजीसीए च्या उड्डाण मानक महासंचालनालयाला मानक संचालन पद्धतीची प्रत दिल्यानंतर आणि कार्याची व्याप्ती एनटीपीसी सादर करेल.त्यानंतरच आरपीएएससुरु करता येईल.
- हवाई छायाचित्रणासाठी आवश्यक परवानगी एनटीपीसी घेईल.
- आरपीएएस द्वारे छायाचित्र/ व्हिडीओग्राफ घेतले असल्यास त्याचा वापर केवळ एनटीपीसीच करेल. आरपीएएस आणि त्याद्वारे द्वारे गोळा केलेल्या माहितीच्या सुरक्षिततेसाठी एनटीपीसी जबादार राहील.
- आरपीएएस चे काम सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच मर्यादित राहील.
- आरपीएएस सुयोग्य स्थिती असल्याची खातरजमा एनटीपीसी करेल.
- साधनाशी संपर्क झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा पोहोचल्यास एनटीपीसी त्यासाठीच्या वैद्यकीय- कायदेविषयक बाबींसाठी जबाबदार राहील.
- अपघाताने तिसऱ्याच पक्षाला नुकसान पोहोचल्यास एनटीपीसी कडे त्यासाठी पुरेसे विमा कवच राहील.
– आरपीएचा वापर करताना कोणतेही घातक साहित्य वाहून नेले जात नाही याची खातरजमा एनटीपीसी करेल.
- जनता, मालमत्ता आणि ऑपरेटर यांची सुरक्षितता आणि गोपनीयता एनटीपीसी सुनिश्चित करेल. यासंदर्भात काही घटना घडल्यास डीजीसीए जबाबदार राहणार नाही.
- सीएआर विभाग 3 शृंखला X भाग I, च्या परिच्छेद 13.1 मध्ये नमूद केलेल्या उड्डाण प्रतिबंधित क्षेत्रात एनटीपीसी, सबंधित मंत्रालयाच्या परवानगीविना आरपीएएस चा उपयोग करणार नाही.
- सीएआर च्या तरतुदीनुसार विमानतळा नजीकच्या भागात आरपीएएस काम करू शकणार नाही. या क्षेत्रात काम करायचे असल्यास भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून पूर्व परवानगी आवश्यक राहील.
- केवळ प्रशिक्षित आणि अनुभवी व्यक्तीच आरपीएएस हाताळेल याची सुनिश्चिती एनटीपीसी करेल.
सार्वजनिक नोटीससाठी लिंक
B.Gokhale/N.Chitale/P.Kor