पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरिया गणराज्याचे अध्यक्ष मुन जे-इन यांच्यादरम्यान दूरध्वनी संभाषण
Posted On:
21 OCT 2020 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरिया गणराज्याचे अध्यक्ष मुन जे-ईन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीसह, आंतरराष्ट्रीय मूल्य साखळींचे सुरु असलेले विविधीकरण, पारदर्शक, विकास-आधारित आणि नियम-आधारित जागतिक व्यापार व्यवस्था जतन करण्याची आवश्यकता आणि जागतिक व्यापर संघटनेची महत्त्वाची भूमिका या महत्त्वाच्या जागतिक घडामोडींचा आढावा घेतला.
दोन्ही नेत्यांनी वरील बाबींसंदर्भात संपर्कात राहून सर्व क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढवण्यास सहमती दर्शविली.
M.Chopade/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1666434)
Visitor Counter : 216
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam