कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते जम्मू केंद्रीय विद्यापीठात पंडित मदन मोहन मालवीय यांचे नाव दिलेल्या नव्या शैक्षणिक संकुलाचा पायाभरणी सोहळा संपन्न

Posted On: 18 OCT 2020 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2020

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते जम्मू येथील केंद्रीय विद्यापीठात पंडित मदन मोहन मालवीय यांचे नाव दिलेल्या नवीन शैक्षणिक संकुलाचा पायाभारणी सोहळा पार पडला. मालवीय यांचे नाव दिलेले जम्मू केंद्रीय विद्यापीठ हे देशातील पहिले केंद्रीय विद्यापीठ आहे असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. 

पंडित मदन मोहन मालवीय आणि डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी 20 व्या शतकाच्या आरंभीचे दोन प्रमुख विद्वान होते, पण त्यांच्या योगदानाची फारशी दखल घेतली गेली नाही, त्यामुळे त्यांना ही योग्य आदरांजली होय. नुकेतच, याच विद्यापीठातील वस्तीगृहाला डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव दिल्याचे सांगत मंत्री म्हणाले, कोलकाता व्यतिरिक्त शासकीय विद्यापीठामध्ये डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, अंतराळ विभागाच्या माध्यमातून उत्तर भारतातील पहिल्या अंतराळ आणि संशोधन अभ्यास केंद्राची सुरुवात जम्मू केंद्रीय विद्यापीठात करण्यात आली आहे, जागतिक ख्यातीचे अंतराळ वैज्ञानिक ज्यांना मंगळ मोहिमेचे जनक म्हणूनही ओळखले जाते, त्या डॉ के. राधाकृष्णन यांची सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, कोणत्याही शैक्षणिक संस्थेला व्यापक मान्यता आणि ओळख मिळावी यासाठी मूलत: दोन पूर्व-आवश्यकता आहेत. एकतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रकाशने तयार करु शकतील असे असाधारण अध्यापक असावेत किंवा तेथे दुसरीकडे सहज उपलब्ध न होऊ शकणारे विशेष अध्ययन विभाग असावेत.

 

B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1665716) Visitor Counter : 100