आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविडशी लढ्यात भारताने गाठला मैलाचा दगड


सक्रीय रुग्णसंख्या दीड महिन्यात प्रथमच 8 लाखांहून कमी

सक्रीय रुग्णसंख्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 10.70%

Posted On: 17 OCT 2020 2:47PM by PIB Mumbai

 

कोविडशी लढ्यात भारताने मैलाचा दगड गाठला आहे. देशातील उपचार घेत असलेल्या (सक्रीय) रुग्णांची संख्या एक ते दीड महिन्यात प्रथमच 8 लाखांच्याही खाली आली आहे. देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या आज 7,95,087 एवढी आहे. ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 10.70% आहे. याआधी 1 सप्टेंबरला सक्रीय रुग्णसंख्या 8 लाखाहून कमी (7,85,996) नोंदवली गेली होती. दररोज मोठ्या संख्येने कोविड रुग्ण रोगमुक्त होत आहेत. यामुळे भारताचा सक्रीय रुग्णसंख्येच्या दरात  सातत्याने घट होत आहे.

WhatsApp Image 2020-10-17 at 9.36.27 AM.jpeg

भारतात बरे होणाऱ्याची संख्या मोठी आहे. या संख्येने 65 लाखांचा (65,24,595) टप्पा ओलांडला आहे. उपचार घेत असलेली (सक्रीय) रुग्णसंख्या आणि बरे झालेले रुग्ण यांच्या संख्येतील फरक सातत्याने वाढत आहे आज तो 57,29,508 एवढा राहिला.

गेल्या 24 तासात 70 हजार 816 पेशंट रुग्ण बरे झाले तर नवीन रुग्णांची संख्या  62 हजार 212 एवढी नोंदवली गेली. राष्ट्रीय पातळीवरील रिकव्हरी दर 87.78% वर पोहोचला.

केंद्र सरकार आणि केंद्र शासित प्रदेश/राज्य सरकार यांच्या समन्वित प्रयत्नातून देशभरात आरोग्य सुविधा बळकट करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने वैद्यकीय उपचार नियमावलीत प्रमाणित मार्गदर्शक सूचनांचा समावेश तसेच वैद्यकीय, निम-वैद्यकीय आणि आरोग्यसेवक यांची समर्पित सेवाभावी सेवा यामुळे बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ दिसत आहे तसेच मृत्यूदरही लक्षणीयरित्या कमी झाला आहे. भारत हा जागतिक पातळीवर सर्वात जास्त रोगमुक्तांची संख्या तसेच सर्वात कमी मृत्यूदर नोंदवणारा देश आहे. मृत्यूदर आज 1.52% राहिला.

WhatsApp Image 2020-10-17 at 9.38.59 AM.jpeg

नवीन रोगमुक्तांच्या संख्येपैकी 78% हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत

महाराष्ट्रात एका दिवसात 13,000 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून मुक्त झाले तर कर्नाटकात 8,000 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून मुक्त झाले.

गेल्या 24 तासात 62,212  नवीन रुग्णांची नोंद झाली. 

यापैकी 79% हे 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातील आहेत.यामध्ये महाराष्ट्राची रुग्णसंख्या मोठी असून महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे  11,000  पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल कर्नाटक, केरळमध्ये प्रत्येकी 7,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.

WhatsApp Image 2020-10-17 at 9.36.28 AM (1).jpeg

गेल्या 24 तासात  837 मृत्यूंची नोंद झाली.  यापैकी सुमारे 82% मृत्यू  दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

महाराष्ट्रात  सर्वात जास्त म्हणजे 306 मृत्यूंची नोंद झाली.

WhatsApp Image 2020-10-17 at 9.36.28 AM.jpeg

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना या महामारीशी सामना करण्यासाठी केंद्राचे सहकार्य मिळत आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने वरिष्ठ पातळीवरील केंद्रीय गट केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल येथे पाठवल्या आहेत.   या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे.

हे गट राज्यांना अलगीकरण सुविधा, संसर्ग माग, निदान चाचण्या, संसर्ग प्रतिबंध, काळजी घेणे तसेच बाधितांवर यथायोग्य औषधोपचार यासाठी मदत पुरवतील.  वेळेवर निदान आणि त्याचा मागोवा यासंदर्भातही हे गट राज्यांना मदतीचा हात देतील.

****

R.Tidke/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665449) Visitor Counter : 171