आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताचा नवा विक्रम, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 73 दिवस
सक्रिय रुग्णांच्या संख्येत घसरण, आता एकूण रुग्णांच्या सुमारे 11 टक्के सक्रिय रुग्ण
Posted On:
15 OCT 2020 2:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020
भारतात कोविड रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे तर कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत सुधारणा झाली असून हा कालावधी आता 73 दिवस (72.8दिवस) इतका झाला आहे. यावरून दररोजच्या नवीन रुग्णांमध्ये घसरण होत असल्याचे स्पष्ट होते आणि परिणामी रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ होत आहे.
ऑगस्ट महिन्यात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 25.5 दिवस होता, तो आता सुमारे 73 दिवस झाला आहे. केंद्र सरकारच्या चाचणी, तत्पर आणि प्रभावी सर्वेक्षण आणि शोध, तात्काळ रुग्णालयीन उपचार हे धोरण आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी याला केलेले सहकार्य यामुळे ही सुधारणा दिसून येत आहे. तसेच डॉक्टर्स, पॅरामेडिक्स, आरोग्य कर्मचारी आणि सर्व कोविड योद्धे यांच्या निस्वार्थी सेवेमुळे हे शक्य झाले आहे.
कोविड योग्य वर्तनाचा अवलंब करण्याबाबत देशभरात वाढणारी जागरूकता संसर्गाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आणि वेळेवर उपचार घेण्यास मदत करत आहे. गेल्या 24 तासात 81,514 नवीन रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 64 लाख (63,83,441) इतकी झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणामुळे रुग्ण बरे होण्याच्या राष्ट्रीय दरात सुधारणा होत आहे. ह्या दराने आता 87 टक्क्यांचा टप्पा पार केला असून तो आता 87.36 टक्के इतका झाला आहे.
नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 79 टक्के रुग्ण 10 राज्य/केंद्रशासितील आहेत. फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 19,000 कोविडबाधित रोगमुक्त झाले आहेत. त्याखालोखाल कर्नाटकात 8000 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 11.12% सक्रिय प्रकरणे आहेत. ही संख्या 8,12,390 इतकी आहे.
देशात गेल्या 24 तासात 67,708 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 77 टक्के नवीन रुग्ण 10 राज्य/केंद्रप्रदेशातील आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 10,000 पेक्षा जास्त बाधित नोंदले गेले, त्याखालोखाल कर्नाटक राज्यात 9,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत 680 कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 12 दिवसांपासून मृत्यू संख्या 1000 पेक्षा कमी आहे.
त्यापैकी सुमारे 80 टक्के रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
यापैकी 23 टक्क्याहून जास्त म्हणजे 158 रुग्णांचे मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.
U.Ujgare /S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664727)
Visitor Counter : 219
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam