संरक्षण मंत्रालय

नौदल मानवंदना सोहळा -2020 नवी दिल्लीत संपन्न

प्रविष्टि तिथि: 14 OCT 2020 6:25PM by PIB Mumbai

 

नौदलात नेतृत्व, व्यावसायिक कामगिरी,आणि उच्च अधिकारीक विशेष सेवा बजाविणाऱ्या नौदलातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी नवीदिल्लीतील आयएनएस इंडिया येथे आज दिनांक 14-आॅक्टोबर 2020 रोजी  एक विशेष मानवंदना सोहळा आयोजित करण्यात आला होता. नौदल प्रमुख, अँडमीरल करमवीर सिंग यांनी नौदलात विशेष सेवा पारितोषिके मिळविणाऱ्या या वर्षीच्या कर्मचाऱ्यांची यादी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जाहीर केली होती.एक युध्दसेवा पदक, एक नौसेना पदक (कर्तव्यनिष्ठता) आणि 6 विशिष्ट सेवा पदके (दीर्घ प्रशंसनीय सेवा) यांसह 8 पदके यावेळी देण्यात आली.

भारतीय नौदलाच्या पारंपारिक पद्धतीनुसार समारंभपूर्व नौदलाच्या कवायतीने सर्व विजेत्यांना मानवंदना देण्यात येते. परंतु सध्याची महामारीची परिस्थिती लक्षात घेता नौदलाच्या प्रत्येक स्थानिक विभागात हा मानवंदना समारंभ संपन्न झाला. या पुरस्कार समारंभाला मर्यादीत संख्येत नौदलातील उच्चपदस्थ अधिकारी आणि पुरस्कार विजेत्यांचे जीवनसाथी उपस्थित होते.या समारंभाच्यावेळी शारीरिक अंतर आणि कोविड-19 शिष्टाचारांचे  पालन करण्यात आले.समारंभ साधेपणाने परंतु पुरस्कार विजेत्यांना संस्मरणीय ठरेल अशा पध्दतीने साजरा झाला.

****

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1664432) आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Tamil , Telugu , Malayalam