आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने चाचण्यांचा नवा टप्पा गाठला
एकूण निदान चाचण्यांची संख्या 90 कोटीहून जास्त
20 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशाचा नव्याने बाधित झालेल्यांची एकूण संख्या राष्ट्रीय पातळीवरील सख्येंपेक्षा कमी
Posted On:
14 OCT 2020 4:12PM by PIB Mumbai
जानेवारी 2020 पासून सुरू असलेल्या कोविड-19 चाचण्यांच्या एकूण संख्येत आता भारताने मोठी मजल मारली आहे. आज दिवसभरानंतर एकूण चाचण्यांच्या संख्येने 9 कोटींचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात 11,45,015 चाचण्या नोंदवल्यावर आता एकूण चाचण्यांची संख्या 9,00,90,122. झाली आहे.
केंद्र आणि राज्ये तसेच केद्रशासित प्रदेशांच्या एकत्रित प्रयत्नांनी देशभरात सुरू झालेल्या 1900 हून जास्त प्रयोगशाळांमुळे देशाच्या चाचण्या करण्याच्या क्षमतेत अनेकपटींने लक्षणीय वाढ झाली आहे. आता दिवसभरात 15 लाख नमुने तपासले जाउ शकतात.

चाचण्या करण्या च्या मुलभूत सुविधांच्या पुरवठ्यात झालेल्या वाढीमुळे ही चाचण्यांची लक्षणीय वाढ शक्य झाली. सरकारी 1112 प्रयोगशाळां तसेच खाजगी 823 प्रयोगशाळा यांसह देशातील 1935 प्रयोगशाळांमुळे दिवसभरातील चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.
चाचण्यांच्या मोठ्या संख्येनेही राष्ट्रीय पातळीवरील बाधितांचा आकडा कमी करण्यात मदत झाली. यामुळे संसर्ग पसरण्याला परिणामकारकरित्या आळा घालता आला.

20 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये बाधितांचा दर हा राष्ट्रीय पातळीवरील दराहून कमी आहे. एकूण बाधितांचा दर हा 8.04% असून त्यात सातत्याने घट होते आहे.

विस्तीर्ण प्रदेशातील मोठ्या प्रमाणावरील चाचण्यांमुळे बाधित रुग्ण लवकर शोधता येतात, परिणामकारक पाळत आणि संसर्गाचा माग तत्पर काढण्यामुळे घरात/इतर ठिकाणी आणि गंभीर केसेसना रुग्णालयात वेळेवर परिणामकारक उपचार देणे शक्य होते. या मुळे मृत्यूदरही कमी करणे शक्य होते.
सध्या भारतात नवीन रूग्णसंख्येहून नवीन रोगमुक्तांच्या संख्येत जास्त भर पडत आहे. परिणामी, बाधीतांची संख्या हळूहळू कमी होत असून ती आज 8,26,876 असून देशातील बाधितांची एकूण संख्या 11.42% एवढी आहे.
गेल्या 24 तासात 74,632 कोविड रुग्ण बरे झाले आणि त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर नवीन रुग्णांची संख्या 63,509 आहे. जास्त रिकवरी दराने एकूण रिकवरी दर 87.05%.ला पोहोचला.
रोगमुक्तांची एकूण संख्या 63,01,927 आहे. बरे होणाऱ्यांच्या आणि बाधितांच्या एकूण संख्येत 54,75,051 एवढा फरक आहे. बरे होणाऱ्यांच्या वाढत्या संख्येने हा फरक अजून वाढतच आहे.
नवीन रोगमुक्तांपैकी 79% महाराष्ट्र, कर्नाटक , केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, ओडिशा आणि दिल्ली या दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
दिवसभरात 15,000 रोगमुक्तांच्या संख्येसह महाराष्ट्राने मोठा वाटा उचलला आहे.

गेल्या 24 तासात 63,509 नवीन केसेस नोंदवल्या गेल्या.
नव्या रुग्णसंख्येपैकी 77% हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. केरळने नव्या रुग्णसंख्येत महाराष्छ्राला मागे टाकले आहे.
केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 3 राज्यांनी 8000 जास्त रुग्णसंख्या नोंदवली, त्याखालोखाल तामिळनाडू व आंध्र प्रदेशने 4000 पेक्षा जास्त संख्या नोंदवली.

गेल्या 24 तासात 730 मृत्यू झाले तर यातील जवळपास 80% हे 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील आहेत,
25% हून जास्त मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले (187 मृत्यू).

देशातील सर्व राज्ये व केद्रशासित प्रदेश कोविड-19च्या जाळ्यात सापडल्याचे दिसत आहे. या मोसमानुसार अंदाज घेता साथाचे डेंग्यू, मलेरिया, फ्ल्यू, लेप्टेस्पायरोसिस, चिकुनगुनिया, मुदतीचा ताप असे अनेक साथीचे आजार या मोसमात पसरतात. निदानातील दुविधा असेल तर याही केसेस कोविड-19च्या म्हणून मोजल्या जातात. कोविड निदान चाचण्या करणाऱ्या पद्धतींना हे एक आव्हानच आहे. यामुळे क्लिनिकल व्यवस्थापन आणि रोगाची लक्षणे यावर अबलंबून रहावे लागते. आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्रालयाने कोविड-19 संसर्ग आणि ईतर सांसर्गित आजार यासाठी मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे.
ती येथे शोधता येईल.
https://www.mohfw.gov.in/pdf/GuidelinesformanagementofcoinfectionofCOVID19withotherseasonalepidemicpronediseases.pdf
****
B.Gokhale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664345)
Visitor Counter : 291
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam