PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
12 OCT 2020 7:35PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)

#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona


दिल्ली-मुंबई, 12 ऑक्टोबर 2020
उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांची आज कोविड-19 चाचणी निगेटीव्ह आली आहे. कोविड-19 संक्रमणाचा संसर्ग झाल्यानंतर 29 सप्टेंबरपासून ते गृहविलगीकरणात होते. आज एम्सच्या वैद्यकीय चमूने उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी श्रीमती उषा नायडू यांची केलेली कोविड-19 आरटी-पीसीआर चाचणी निगेटीव्ह आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजया राजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे आज अनावरण करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी राजमाता विजयाराजे शिंदे यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदरांजली अर्पण केली.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
भारतामध्ये कोविड सक्रिय रूग्णांच्या संख्येत सातत्याने घट होण्याचा कल कायम-भारतामध्ये कोविड सक्रिय रूग्णांच्या संख्येत सातत्याने घट होण्याचा कल कायम आहे. सलग चौथ्या दिवशी देशभरामध्ये 9 लाखांपेक्षा कमी कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.
देशात सध्या 8,61,853 सक्रिय रूग्ण आहेत. हे प्रमाण 12.10टक्के आहे.
भारतामध्ये कोविड-19 रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. कोरोना आजारमुक्त झालेल्यांची संख्या आता जवळपास 61.5 लाख (61,49,535) आहे. नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणा-यांचा आकडा जास्त आहे. सक्रिय रूग्ण आणि कोरोनामुक्त होणा-यांची संख्या यांच्यामधील तफावत सातत्याने वाढत आहे. आज हे अंतर 52,87,682 होते.
गेल्या 24 तासांमध्ये 71,559 कोरोनारूग्ण पूर्ण बरे झाले आणि त्यांना रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले. तर नवीन 66,732 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय रोगमुक्तता दर वाढून तो आता 86.36 टक्के झाला आहे.
कोविड विरुद्ध लढणे हाच आपला प्रमुख धर्म असून कुठलाही देव किंवा धर्म सण दिमाखात साजरे करण्यास सांगत नाही, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
समाज माध्यमांवरून पाठवण्यात आलेल्या असंख्य प्रश्नांना त्यांनी ‘संडे संवाद’ कार्यक्रमाच्या पाचव्या भागात उत्तरे दिली. कोविड 19 विषयक अनेक गैरसमज त्यांनी दूर केले आगामी सणउत्सव घरातच साजरे करण्याचे, यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. साथ अधिक पसरू नये या दृष्टीने दोन महिन्यांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नाऱ्यानुसार प्रतिज्ञा घेऊन देशभरातल्या व्यापक जनजागृतीसाठीच्या ‘जन आंदोलन’ मोहिमेत सहभागी होण्यास त्यांनी नागरिकांना सांगितले आहे. कोविड 19 चा विषाणू श्वसनाशी संबंधित विषाणू असून हिवाळ्याच्या ऋतूत संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगून कोविड रोखण्याच्या दृष्टीने सुसंगत वर्तन ठेवण्याची सूचना डॉ. हर्षवर्धन यांनी केली.
इतर अपडेट्स:
-
अर्थव्यवस्थेला एकूण एक लाख कोटी रुपयांची चालना देणाऱ्या उपायांची निर्मला सीतारामण यांच्याकडून घोषणा-गरीब आणि दुर्बल घटकांसाठी आत्मनिर्भर पॅकेजमध्ये तरतूद करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू मध्ये सुधारणा झाली आहे परंतु मागणी वाढवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे असे वित्तमंत्र्यांनी सांगितले. मागणी वाढवण्याचे प्रयत्न आर्थिक शिस्त ध्यानात ठेवून घेतले जातील काही ठिकाणी खर्च वाढवावा लागेल, त्यातील काही बाजू या जीडीपी वाढवण्याशी संबंधित आहेत.
-
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली-भारतीय हवामानखात्याच्या चक्रीवादळ इशारा विभागानुसार, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकला असून त्याची तीव्रता वाढली आहे. 13 ऑक्टोबर रोजी मुसळधार (>20 सेंमी प्रतिदिन) पाऊस दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात होईल. तर, 14 ऑक्टोबर रोजीसुद्धा मुसळधार (>20 सेंमी प्रतिदिन) एवढा पाऊस कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होण्याची शक्यता आहे
-
होमिओपॅथीच्या माध्यमातून त्वचाविकारांवर उपचार-त्वचा रोगांवर होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार करता येऊ शकतात. यासंबंधीचा अभ्यास शिलाँग येथील नॉर्थ ईस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद अँड होमिओपॅथीच्या आयुहोम या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. होमिओपॅथीत पाच वेगवेगळ्या त्वचेच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पाच रूग्णांवर केलेल्या उपचारांचे उल्लेखनीय परिणाम दिसून आले जे अशा प्रकारच्या त्वचेच्या विकारांवर होमिओपॅथीच्या औषधाच्या सकारात्मक परिणामाची खात्री पटवून देतात.
-
भारतीय जलतरण महासंघाने पुन्हा तरणतलाव सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. महासंघाचे सरचिटणीस मोनल चोकसी म्हणाले, सरकारने स्पर्धात्मक जलतरण पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिल्याने आम्हाला फार आनंद झाला आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने जारी केली एसओपी व्यापक आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्यास आमचे प्राधान्य असेल.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले की, कोरोना रुग्णांची संख्या राज्यात सातत्याने वाढत आहे, त्यामुळे दिवाळीपूर्वी शाळा सुरु करण्यात येणार नाहीत. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीसुद्धा सांगितले की, त्यांच्या विभागानेसुद्धा कोविड-19 परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत महाविद्यालय सुरु करण्यात येऊ नयेत, असे ठरवले आहे. राज्यात रविवारी 10,792 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली, यामुळे राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 2.21 लाख एवढी झाली आहे.
FACT CHECK


* * *
MC/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663780)
Visitor Counter : 172