आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आपल्या मतदारसंघातील समस्या दूर करण्यासाठी ‘संडे संवाद -5’ दरम्यान डॉ. हर्ष वर्धन यांनी जाहीर केला आपला वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांक


‘कोविडविरुद्ध लढणे हाच आपला प्रमुख धर्म, कुठलाही देव किंवा धर्म सण दिमाखात साजरे करण्यास सांगत नाही’

देशात अनेक कोविड -19 लसीच्या व्यवहार्यतेविषयी पडताळणी करण्यास मोकळेपणाने तयार

Posted On: 11 OCT 2020 7:32PM by PIB Mumbai

 

‘कोविड विरुद्ध लढणे हाच आपला प्रमुख धर्म असून कुठलाही देव किंवा धर्म सण दिमाखात साजरे करण्यास सांगत नाही, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
समाज माध्यमांवरून पाठवण्यात आलेल्या असंख्य प्रश्नांना त्यांनी ‘संडे संवाद’ कार्यक्रमाच्या पाचव्या भागात उत्तरे दिली. कोविड 19 विषयक अनेक गैरसमज त्यांनी दूर केले आगामी सणउत्सव घरातच साजरे करण्याची, यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. साथ अधिक पसरू नये या दृष्टीने दोन महिन्यांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नाऱ्यानुसार प्रतिज्ञा घेऊन देशभरातल्या व्यापक जनजागृतीसाठीच्या ‘जन आंदोलन’ मोहिमेत सहभागी होण्यास त्यांनी नागरिकांना सांगितले आहे. कोविड 19 चा विषाणू श्वसनाशी संबंधित विषाणू असून हिवाळ्याच्या ऋतूत संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगून कोविड रोखण्याच्या दृष्टीने सुसंगत वर्तन ठेवण्याची सूचना डॉ. हर्षवर्धन यांनी केली.
आगामी काही काळातच ब हु दा चाचणी उपलब्ध होईल,असे डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले. विविध प्रकारच्या लसीबाबत भारत विचार करत आहे. यातल्या काही लसी विशिष्ठ वयोगटासाठी योग्य असू शकतील तर काही नसूही शकतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. आर्थिक कारणासाठी तरुण आणि काम करणाऱ्या वयोगटाला कोविड 19 लस देण्यास सरकारचे प्राधान्य असल्याच्या अफवेचे त्यांनी खंडन केले. मात्र व्यावसायिक धोका, संसर्ग होण्याची अधिक जोखीम या बाबी विचारात घेतल्या जातील असे ते म्हणाले.

कोविड 19 लसीच्या आपत्कालीन वापर अधिकारबाबत, रुग्णसुरक्षा महत्त्वाची असल्याचे डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले. पुढील निर्णय आकडेवारीवर अवलंबून असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात सध्या ज्या लसींच्या चाचण्या सुरू आहेत त्या दोन आणि तीन डोसच्या लसी आहेत , अशी माहिती त्यांनी दिली. देशाची प्रचंड लोकसंख्या विचारात घेता, कुठलाही एक उत्पादक संपूर्ण देशाची गरज भागवू न शकण्याची शक्यता विचारात घेऊन अनेक कोविड 19 लसींच्या व्यवहार्यतेच्या पडताळणीबाबत खुलेपणाने विचार करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. समाजमाध्यमावरील चुकीच्या निराधार वृत्तांवर विश्वास न ठेवण्याचे आणि आपली माहिती देताना ती मागणाऱ्याच्या विश्वासार्हतेची खातरजमा करण्याचे आवाहन हर्षवर्धन यांनी केले. अशा प्रकारची खोटी वृत्त आढल्यास पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक यूनिटशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

पुन्हा संसर्ग होण्यासंदर्भात आलेल्या घटनांचे आय सी एम आर विश्लेषण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या संरक्षणासाठी राज्यांना पुरवण्यात येत असलेल्या साहाय्याविषयी डॉ हर्षवर्धन यांनी माहिती दिली. यासाठी आपण स्वतः राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. देशात टेलीमेडिसीन सेवा स्वीकारली जात असल्याचे ते म्हणाले.

कोविड 19 विरुद्ध लढण्यासाठी भारत सरकारने पहिल्या टप्प्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 3000 कोटी रुपये जारी केले. तीन राज्ये वगळता बहुतांश सर्व राज्यांनी या अनुदानाचा उपयोग केला. महाराष्ट्राने केवळ 42.5% अनुदान वापरले असून चंदीगडने 47.8% तर दिल्लीने 75.4% अनुदान वापरल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

आयुष उपचारांबाबत त्यांनी अभ्यासात्मक भूमिका यावेळी मांडली.

चाँदनी चौक या आपल्या मतदारसंघातील समस्या दूर करण्यासाठी ‘संडे संवाद -5’ दरम्यान डॉ. हर्षवर्धन यांनी आपला वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर केला.

हा कार्यक्रम खालील लिंकवर पाहता येईल.

Twitter: https://twitter.com/drharshvardhan/status/1315196225805717505?s=20

Facebook: https://www.facebook.com/watch/?v=1045439492574995

Youtube: https://www.youtube.com/watch?v=V8M-ujWIqoA

DHV App: http://app.drharshvardhan.com/download

 

****

B.Gokhale/S.Kakade/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1663574) Visitor Counter : 205