आयुष मंत्रालय
होमिओपॅथीच्या माध्यमातून त्वचाविकारांवर उपचार
Posted On:
12 OCT 2020 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020
त्वचा रोगांवर होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार करता येऊ शकतात. यासंबंधीचा अभ्यास शिलाँग येथील नॉर्थ ईस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद अँड होमिओपॅथीच्या आयुहोम या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा अभ्यास संगीता साहा, रीडर, मेडिसन विभाग आणि महाकास मंडल, पोस्ट ग्रॅजुएट ट्रेनी, डिपार्टमेंट ऑफ प्रैक्टिस ऑफ मेडिसिन, कोलकाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यांच्यासह कौशिल्या भारती, पोस्ट ग्रॅजुएट ट्रेनी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी, कोलकाता यांनी केला आहे.
होमिओपॅथीत पाच वेगवेगळ्या त्वचेच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पाच रूग्णांवर केलेल्या उपचारांचे उल्लेखनीय परिणाम दिसून आले जे अशा प्रकारच्या त्वचेच्या विकारांवर होमिओपॅथीच्या औषधाच्या सकारात्मक परिणामाची खात्री पटवून देतात.
त्वचाविकार अनेक प्रकारचे आणि वारंवार येणारी आरोग्य समस्या आहे. ही समस्या केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर देखील सर्व वयोगटांवर परिणाम करणारी आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या अंदाजानुसार त्वचा रोज जगातील गैर-असाध्य रोगांच्या ओझ्याचे चौथे प्रमुख कारण आहे. होमिओपॅथीशी संबंधित तज्ज्ञ सांगतात की, सामान्य त्वचाविकार रोगांसाठी होमिओपॅथीच्या माध्यमातून स्वस्त आणि प्रभावी उपचार केले जाऊ शकतात.
ऑर्गनन ऑफ मेडिसिनच्या निर्देशांनुसार आणि प्रत्येक रोग्याच्या वैयक्तिक संवेदनशीलतेनुसार वेगवेगळ्या टप्प्यांत संकेतित औषध वापरल्यानंतर हे लक्षात आले की, ही औषधं केवळ त्वचेचे व्रण कुशलतेने मिटवत नाही तर रोग्यांना आराम देण्यासही सक्षम होती. एवढेच नाही तर उपचारादरम्यान कोणत्याही रोग्याने प्रतिकूल प्रभावाची तक्रार केली नाही.
केस स्टडीज हा पायलट प्रोजेक्ट मानला जाऊ शकतो. पुढील टप्प्यात मोठ्या सॅम्पल आकारासह नियंत्रित चाचण्या घेता येतील जेणेकरून विषाणूजन्य त्वचेच्या रोगांकरिता होमिओपॅथीच्या उपचार शक्तीवर निर्णायक पुरावे निर्माण होऊ शकतील.
* * *
M.Iyengar/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663694)
Visitor Counter : 777