आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतामध्ये कोविड सक्रिय रूग्णांच्या संख्येत सातत्याने घट होण्याचा कल कायम
एकूण कोविडबाधितांपैकी 12.10 टक्के सक्रिय रूग्ण
सलग चौथ्या दिवशी सक्रिय रूग्णसंख्या 9 लाखांपेक्षा कमी
Posted On:
12 OCT 2020 1:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020
भारतामध्ये कोविड सक्रिय रूग्णांच्या संख्येत सातत्याने घट होण्याचा कल कायम आहे. सलग चौथ्या दिवशी देशभरामध्ये 9 लाखांपेक्षा कमी कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.
देशात सध्या 8,61,853 सक्रिय रूग्ण आहेत. हे प्रमाण 12.10टक्के आहे.
भारतामध्ये कोविड-19 रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. कोरोना आजारमुक्त झालेल्यांची संख्या आता जवळपास 61.5 लाख (61,49,535) आहे. नवीन कोरोनाबाधितापेक्षा कोरोनामुक्त होणा-यांचा आकडा जास्त आहे. सक्रिय रूग्ण आणि कोरोनामुक्त होणा-यांची संख्या यांच्यामधील तफावत सातत्याने वाढत आहे. आज हे अंतर 52,87,682 होते.
गेल्या 24 तासांमध्ये 71,559 कोरोनारूग्ण पूर्ण बरे झाले आणि त्यांना रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले. तर नवीन 66,732जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय रोगमुक्तता दर वाढून तो आता 86.36 टक्के झाला आहे.
नव्याने कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये 77 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात एका दिवसामध्ये 10,000पेक्षा जास्त संख्येने रूग्ण बरे झाल्याची नोंद आहे.
गेल्या 24 तासांमध्ये नव्याने 66,732 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
यापैकी 81 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. सर्वात जास्त कोरोना रूग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात एका दिवसामध्ये 10,000 पेक्षा जास्त कोरोनारूग्ण आढळले. त्याखालोखाल कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये 9000 पेक्षा जास्त जणांना कोरोना आजार झाला.
गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोना आजारामुळे 816 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 85 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
महाराष्ट्रात 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, हे प्रमाण 37टक्के आहे.
* * *
U.Ujgare/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663667)
Visitor Counter : 258
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam