युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

क्रीडा मंत्रालयाने जारी केलेल्या क्रीडाविषयक मानक प्रणालीसह ऑलिम्पिक प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचे जलतरणपटूंनी केले स्वागत

Posted On: 10 OCT 2020 8:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2020

भारतीय जलतरणपटूंनी देशभरातील तरण तलाव पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शुक्रवारी, क्रीडा मंत्रालयाने स्पर्धात्मक जलतरणपटूंसाठी तरण तलावांचा वापर करण्याविषयी मानक प्रणाली (एसओपी) जारी केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 30 सप्टेंबर रोजीच्या आदेशात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर ठिकाणचे तरणतलाव पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली होती.

भारतीय जलतरण महासंघाने पुन्हा तरणतलाव सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. महासंघाचे सरचिटणीस मोनल चोकसी म्हणाले, सरकारने स्पर्धात्मक जलतरण पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिल्याने आम्हाला फार आनंद झाला आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने जारी केली एसओपी व्यापक आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्यास आमचे प्राधान्य असेल. 

ऑलिम्पिक पात्रतेसाठी सहा भारतीय जलतरणपटूंना बी श्रेणी प्राप्त झालेल्यांपैकी एक आणि 2008 ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला जलतरणपटू वीरधवल खाडे यांच्यासह, श्रीहरी नटराज आणि कुशाग्र रावत यांनी क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.     

 

B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663432) Visitor Counter : 139