ग्रामीण विकास मंत्रालय
गरीब कल्याण रोजगार अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 32 कोटी मानव दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला असून आतापर्यंत 31,500 कोटी रुपयांहून अधिक खर्च
Posted On:
12 OCT 2020 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020
ग्रामीण भागातील स्थलांतरित कामगारांच्या रोजगार व उदरनिर्वाहाच्या संधींना चालना देण्यासाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाद्वारे 6 राज्यांच्या 116 जिल्ह्यांमध्ये गावकऱ्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
15 व्या आठवड्यापर्यंत एकूण 32 कोटी मानव दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला असून अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 31,577 कोटी रुपये खर्च करण्याचे आले आहेत. 1,32,146 जलसंधारण संरचना, 4,12,214 ग्रामीण घरे, 35,529 गुरांसाठीची छावणी, 25,689 शेत तलाव, आणि 16,253 कम्युनिटी सॅनेटरी कॉम्प्लेक्स यासह मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले आहेत. जिल्हा खनिज निधीच्या माध्यमातून 7340 कामे हाती घेण्यात आली आहेत, 2123 ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे, घन व द्रव कचरा व्यवस्थापनाशी संबंधित एकूण 21,595 कामे हाती घेण्यात आली आहेत, आणि कृषी विज्ञान केंद्राद्वारे (केव्हीके) 62,824 उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण दिले गेले आहे.
12 मंत्रालये / विभाग आणि राज्य सरकार यांच्या अविरत प्रयत्नांमुळे अभियानाला हे यश प्राप्त झाले आहे. या अभियानामुळे स्थलांतरित कामगार आणि ग्रामीण समुदायांना जास्त प्रमाणात लाभ होत आहेत. रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी आपल्या गावी राहणाऱ्या कामगारांना या दीर्घ मुदतीच्या उपक्रमामुळे भविष्यासाठी फायदा होणार आहे.
* * *
M.Chopade/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663767)
Visitor Counter : 185
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam