विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर-केपीआयटीकडून हायड्रोजन इंधन सेल युक्त कारचे प्रदर्शन
पीईएम इंधन सेल तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी पूर्णतः सीएसआयआरची अंतर्गत इलेक्ट्रोड असेम्बली
Posted On:
10 OCT 2020 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2020
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि केपीआयटीने भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधन सेल (एचएफसी) प्रोटोटाईप कारचे सीएसआयआर- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे प्रदर्शन केले. इंधन सेल हे कमी तापमानावरील पीईएम (प्रोटोन एक्सचेंज मेम्ब्रान) प्रकारचे इंधन सेल आहे, जे 65-75 डिग्री सेंटीग्रेड तापमानात, वाहन अनुप्रयोगासाठी अनुकूल आहे.
सीएसआयआर आणि केपिआयटीने यशस्वीरित्या 10 kWe क्षमतेची स्वयंचलित श्रेणीची एलटी-पीईएमएफसी इंधन सेल विकसित केले आहे, जे सीएसआयआरच्या कृतीतून ज्ञान (know-how) कार्यक्रमावर आधारीत आहे.
केपीआयटीने स्टॅक अभियांत्रिकीत नवीन कौशल्य विकसित केले ज्यात हलक्या वजनाचे धातू द्विध्रुवी प्लेट आणि गॅस्केट डिझाइन, बॅलेन्स ऑफ प्लान्ट (बीओपी), सिस्टम इंटिग्रेशन, कंट्रोल सॉफ्टवेयर आणि इलेक्ट्रिक पॉवर ट्रेन जे इंधन सेल वाहन चालविण्यास सक्षम करते.
इंधन सेल स्टॅकसह नंतर विकसित केलेल्या (रेट्रोफिटेड) बॅटरी-इलेक्ट्रिक पॅसेंजर कार प्लॅटफॉर्मवर चाचण्या करण्यात आल्या. तथापी, हे तंत्रज्ञान बस आणि ट्रक यासारख्या व्यापारी वाहनांना अधिक अनुकूल ठरेल अशी अपेक्षा आहे. अपेक्षित ऑपरेटिंग श्रेणी मिळविण्यासाठी बॅटरी इलेक्ट्रिक बस/ ट्रकना मोठ्या बॅटरीची आवश्यकता असते. या तुलनेत एचएफसी तंत्रज्ञानासाठी मोठ्या ऑपरेटींग श्रेणीसाठी लहान बॅटरीची आवश्यकता असते. म्हणून एचएफसी तंत्रज्ञान व्यावसायिक वाहनांसाठी अधिक अनुकूल आहे.
एफसी वाहनांमध्ये टाईप- III हायड्रोजन टाकी बसविण्यात आली आहे. या टाकीची क्षमता सुमारे 1.75 किलोग्रॅम हायड्रोजन 350 बार दाब एवढी आहे. यामुळे एफसी वाहन भारतीय रस्त्यांवर 60-65 प्रति तास या वेगाने धावू शकेल. संपूर्ण इंधन सेल स्टॅक आणि पॉवर ट्रेनसह संबंधित घटक प्रमाणित 5 सीटर सेडान कारमध्ये रेट्रो फिट होते.
या महत्त्वपूर्ण उपलब्धीविषयी बोलताना केपीआयटीचे अध्यक्ष रवी पंडित म्हणाले, तंत्रज्ञानाला उत्तम भविष्य आहे आणि देशी विकासामुळे पूर्वीपेक्षा व्यावसायिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य होण्याची अपेक्षा आहे. हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे जे भारताला प्रदूषण कमी करण्यात आणि आपल्या जीवाश्म इंधनाची आयात कमी करण्यात मदत करेल.
सीएसआयआर-एनसीएलचे संचालक प्रो. अश्विनीकुमार नांगिया औद्योगिक भागीदार म्हणून स्वदेशी सीएसआयआर-एनएमआयटीआय तंत्रज्ञान आणि केपीआयटीच्या व्यावसायिक भागीदारीच्या सहाय्याने हायड्रोजन इंधन सेलवर चालविल्या जाणार्या पहिल्या यशस्वी कारबद्दल टीमचे अभिनंदन करताना म्हणाले, हायड्रोजनवर आधारित नवीकरणीय ऊर्जेची देशातील वाहतुकीसाठी इंधन म्हणून वापर करण्याची वेळ आली आहे. यामुळे केवळ पेट्रोल, डिझेल आयातीचा खर्च कमी होणार नाही तर हायड्रोजन हे एकमेव स्वच्छ इंधन आहे ज्याचे उप-उत्पादन केवळ पाणी आहे. सीएसआयआरच्या एनएमआयटीएलआय अंतर्गत ऊर्जा क्षेत्रातील दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीला यश आले आहे.
B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663427)
Visitor Counter : 266