रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून 2020-21 च्या पहिल्या सहा महिन्यांत 3951 किमी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण; कोविड-19 संकट काळातही प्रति दिन 21.60 किमी रस्त्यांचे बांधकाम

Posted On: 09 OCT 2020 2:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2020


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत) 3951 किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. कोविड -19 महामारीच्या संकट काळातही दिवसाकाठी 21.60 किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम करण्याचा दर साध्य केला आहे. मंत्रालयाने या आर्थिक वर्षात 11,000 किमी लांबीच्या रस्ते बांधकामाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.


* * *

U.Ujgare/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663047) Visitor Counter : 126