पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनावर.केला शोक व्यक्त

Posted On: 08 OCT 2020 10:55PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, माझे दुःख शब्दातीत आहे. आपल्या देशात कदाचित कधीच भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. राम विलास पासवानजी यांचे निधन वैयक्तिक हानी आहे. मित्र, आणि गरीबांना सन्मानपूर्वक जीवन प्रदान करण्यासाठी झटणारा मौल्यवान सहकारी मी गमावला आहे. 

रामविलास पासवानजी कष्टाने आणि दृढनिश्चयातून राजकारणात उदयाला आले होते. युवा नेते असताना त्यांनी आणीबाणीच्या काळातील अत्याचार आणि लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रतिकार केला. ते उत्कृष्ट संसदपटू आणि मंत्री होते, अनेक धोरणात्मक क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान होते. 

पासवानजी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा अतुल्य अनुभव होता. कॅबिनेट बैठकांदरम्यानचे त्यांचे विचार समजूतदारपणाचे होते. राजकीय बुद्धिमत्ता, शासकीय मुद्यांवरील मुत्सद्दीपणात ते अतिशय हुशार होते. त्यांचे कुटुंब आणि समर्थकांप्रती सहवेदना. ओम शांती.     

I am saddened beyond words. There is a void in our nation that will perhaps never be filled. Shri Ram Vilas Paswan Ji’s demise is a personal loss. I have lost a friend, valued colleague and someone who was extremely passionate to ensure every poor person leads a life of dignity. pic.twitter.com/2UUuPBjBrj

— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2020

Shri Ram Vilas Paswan Ji rose in politics through hardwork and determination. As a young leader, he resisted tyranny and the assault on our democracy during the Emergency. He was an outstanding Parliamentarian and Minister, making lasting contributions in several policy areas. pic.twitter.com/naqx27xBoj

— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2020

Working together, shoulder to shoulder with Paswan Ji has been an incredible experience. His interventions during Cabinet Meetings were insightful. From political wisdom, statesmanship to governance issues, he was brilliant. Condolences to his family and supporters. Om Shanti.

— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2020

***

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1662908) Visitor Counter : 71