संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय वायू दलाच्या 88 व्या हवाई दल दिन-2020 निमित्त्य वायू दलातील सर्व लढवय्यांना शुभेच्छा दिल्या
Posted On:
08 OCT 2020 3:42PM by PIB Mumbai
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज भारतीय वायू दलाच्या 88 व्या हवाई दल दिन-2020 निमित्त्य वायू दलातील सर्व लढवय्ये आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. “समर्पण, त्याग आणि उत्कृष्टता यांचा 88 वर्षांच्या प्रवासाने भारतीय वायू दल आज एक अजिंक्य संहारक आणि प्रचंड शक्ती म्हणून गणले जाते”, असे आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे.
निळा गणवेश असणाऱ्या या दलातील स्त्री पुरुषांचा राष्ट्राला अभिमान वाटतो आणि ते आव्हान स्विकारून शत्रूंशी सामना करायला निघतात तेव्हा देश त्यांना सॅल्यूट करतो.
“आधुनिकीकरण आणि स्वदेशीकरण या दोन्हीच्या योगे भारतीय वायू दलाची आव्हानात्मक शक्ती कायम राखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत” असे सिंग यांनी त्यांच्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
भारतीय वायू दल कोणत्याही परिस्थितीशी सामना करत राष्ट्राच्या गगनाचे संरक्षण करत राहील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी “मी तुम्हाला निळ्या आभाळभर शुभेच्छा आणि सुखरूप उड्डाणासाठी शुभेच्छा देतो” असे नमूद केले आहे.
***
B.Golhale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662727)
Visitor Counter : 147
Read this release in:
Tamil
,
Malayalam
,
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu