पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यामध्ये दूरध्वनीवरून चर्चा
प्रविष्टि तिथि:
07 OCT 2020 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिवादन करून शुभेच्छा दिल्या.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर दीर्घकाळापासून असलेले दृढ स्नेहबंध आणि मैत्रीसंबंधीच्या आठवणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाग्या केल्या. तसेच उभय देशांमध्ये विशेष आणि अधिकारात्मक नीतिगत सहभागीता अधिक चांगली व्हावी आणि संबंध अधिक दृढ करण्यासाठी पुतीन यांनी व्यक्तिगत स्तरावरही महत्वाची भूमिका बजावली, याचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.
कोविड-19 महामारीच्या उद्रेकाची झळ संपूर्ण जगालाच बसली आहे, अशा अवघड काळामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामना करण्यासाठी आगामी काळामध्ये संपर्कामध्ये राहून सहकार्य करण्याचे उभय नेत्यांनी मान्य केले. सार्वजनिक आरोग्याच्या स्थितीमध्ये सुधारणा होवून, सर्वत्र जनजीवन सुरळीत झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे भारतात स्वागत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी उत्सुकता व्यक्त केली.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1662321)
आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam