पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता ‘सामाजिक सबलीकरणासाठी विश्वासार्ह कृत्रिम बुद्धिमत्ता 2020’ परिषदेचे उद्‌घाटन करणार

रेझ 2020- कृत्रिम बुद्धिमत्तेवरील भव्य आभासी परिषदेचे 5-9 ऑक्टोबर दरम्यान आयोजन

जागतिक एआय उद्योग जगतातील प्रतिनिधी परिषदेत चर्चा करणार

Posted On: 03 OCT 2020 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी रेझ 2020- ‘सामाजिक सबलीकरणासाठी विश्वासार्ह कृत्रिम बुद्धिमत्ता 2020’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील भव्य आभासी परिषदेचे 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता उद्‌घाटन करणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोगाने 5 ते 9 ऑक्टोबर, 2020 दरम्यान या भव्य आभासी परिषदेचे आयोजन केले आहे. 

रेझ 2020 ही आरोग्य क्षेत्र, कृषी, शिक्षण आणि स्मार्ट मोबिलिटी या क्षेत्राच्या समावेश आणि सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण आणि आराखडा तयार करण्यासाठी जागतिक पातळीवरील बैठक असेल.

रेझ 2020 परिषदेत, जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील संशोधन, धोरण आणि नावीन्यपूर्ण विषयातील प्रतिनिधी आणि तज्ज्ञ सहभागी होतील.  ‘संक्रामक रोगविरोधातील तयारीसाठी एआयचा लाभ’ ‘डिजिटलीकरणासंदर्भात नावीन्यपूर्ण प्रेरणा’ ‘सर्वसमावेशक एआय’ ‘यशस्वी नवकल्पनांसाठी भागीदाऱ्या’ या विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे.   

रेझ 2020 परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्टार्ट अप्सचा समावेश असणार आहे. एआय तोडगा आव्हान याअंतर्गत निवडलेली स्टार्ट अप 6 ऑक्टोबर 2020 रोजी एआय स्टार्ट अप पीच फेस्टमध्ये त्यांनी काढलेले उपाय/तोडगे सादर करतील. तंत्रज्ञान उद्योजक आणि स्टार्टअप्सना वाव, मान्यता आणि मार्गदर्शन प्रदान करुन देण्याच्या भारत सरकारच्या निरंतर पाठिंब्याचा हा भाग आहे.

जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकोसिस्टम, आयआयटी सारख्या उच्च दर्जाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, मजबूत आणि सर्वव्यापी डिजिटल पायाभूत सुविधा आणि दरवर्षी नव्याने येणारे STEM पदवीधर, यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थान म्हणून भारत चांगल्या स्थितीत आहे. एआय 2035 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत 957 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी भर घालेल, असा उद्योगजगतातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सबका साथ सबका विकास या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय फॉर ऑल) या धोरणाचे प्रतिनिधित्व करून देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी एआय मिळविण्याची योजना आखली आहे. पंतप्रधानांनी निर्देशित केल्याप्रमाणे, भारत लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील  केवळ नेतृत्व म्हणून नाही तर एआयचा जबाबदारीने सामाजिक सबलीकरणासाठी कसा वापर करायचा हे जगाला दाखवण्याच्या अभिरुपाने लवकरच आंतरराष्ट्रीय समुदायासमोर उभा राहील.   

रेझ 2020 (http://raise2020.indiaai.gov.in/) परिषद एआय नैतिक दृष्टीने विकसित करणे आणि वापर करण्याची आवश्यकता याबद्दल जनजागृती करण्यासाठी कल्पनांची देवाणघेवाण सुलभ करेल.

रेझ 2020 विषयी:

रेझ 2020 ही विश्वासार्ह एआयच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन, समावेश आणि सक्षमीकरणासाठी भारताची दृष्टी आणि रोडमॅप बनविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील जागतिक स्तरावर आयोजित केलेली पहिलीच बैठक आहे. भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जागतिक उद्योजक, महत्त्वाचे मतकर्ते, सरकारी प्रतिनिधी आणि शिक्षणतज्ज्ञांचा मोठा सहभाग असेल.

संकेतस्थळ: http://raise2020.indiaai.gov.in/

 

B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1661415) Visitor Counter : 22