आदिवासी विकास मंत्रालय
देशातील आदिवासी उत्पादनांसाठीची सर्वात मोठी बाजारपेठ “ ट्राईब्स इंडिया-ई मार्केटप्लेस” आणि कोलकाता व हृषीकेश येथे दोन नव्या आदिवासी उत्पादन विक्री केंद्रांचे अर्जुन मुंडा यांच्या हस्ते उद्घाटन
पहाडिया आदिवासी जमातीकडून तयार केल्या जाणाऱ्या ‘पकूर मधाचेही’ उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2020 5:32PM by PIB Mumbai
“द ट्राईब्स इंडिया ई-मार्केटप्लेस, ही हस्तकला आणि नैसर्गिक उत्पादनांची देशातली सर्वात मोठी बाजारपेठ असून, आदिवासी लोक आणि आदिवासी जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने हा एक पथदर्शी उपक्रम सिध्द होईल, कोविड संकट असतांनाही ट्रायफेडच्या योध्यांनी आदिवासी जमातीच्या लोकांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी, वस्तू विपणनाचा उद्देश कायम ठेवला आणि जाहिरात तसेच विपणनाचे अभिनव मार्ग शोधून काढले, याचा मला विशेष आनंद आहे.” असे मत केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी व्यक्त केले. “द ट्राईब्स इंडिया ई (market.tribesindia.com)-मार्केटप्लेस चे ऑनलाईन उद्घाटन झाल्यावर ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला अनुसरून ट्रायफेड ने हा आज म्हणजे 2 ऑक्टोबरला नवा उपक्रम सुरु केला आहे.

यावेळी राज्यमंत्री रेणुका सिंह, छृत्तीसगढचे मंत्री आणि TRIFED इतर संस्थांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुंडा यांनी ट्राइफेडच्या इतर उपक्रमाचेही उद्घाटन केले. यात कोलकाता आणि हृषीकेश येथील आदिवासी वस्तू विक्री केंद्रांचाही समावेश आहे. त्याशिवाय, झारखंड आणि छत्तिसगढ येथील आदिवासी उत्पादनेही या विक्री केंद्रात विकली जाणार आहेत. त्यासाठी ट्रायफेड ने अमेझॉनशी करार केला आहे. त्याशिवाय, ट्रायफेड आणि ट्राईब्स इंडिया ने तयार केलेले पकूर मध या 100 टक्के नैसर्गिक मधाचे देखील यावेळी उद्घाटन करण्यत आले , झारखंड येथील पकूर इथल्या संथाल समुदायाचे लोक हे दुर्मिळ मध गोळा करतात. अत्यंत दुर्बल अशा पहाडी आदिवासी जमाती हे पकूर मध तयार करतात.

यावेळी बोलतांना, अर्जुन मुंडा म्हणाले की आदिवासी उत्पादनांच्या ई बाजारपेठ हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून, याद्वारे आदिवासींच्या विविध वस्तू, हस्तकला, नैसर्गिक खाद्यपदार्थ, हातमाग अशी 5 लाख उत्पादने देशभरात पोहोचवण्याचा ट्रायफेड चा प्रयत्न आहे.

यात आदिवासींच्या वैयक्तिक तसेच संस्था, बचत गट यांनी एकत्र येऊन केलेल्या उत्पादनांचाही समावेश आहे. या मंचावरून, आदिवासींना त्यांची उत्पादने विक्री करण्याचे अनेकविध मार्ग उपलब्ध होणार आहेत.
आदिवासी विकास मंत्रालय, आदिवासी हस्तकलाकारांच्या कौशल्य विकासावर भर देत असून त्याद्वारे, त्यांना अधिक कुशल करण्यासाठी प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांची उत्पादने देशभरात विकली जातील. पकूर मधाचे संकलन अत्यंत पर्यावरणस्नेही पद्धतीने स्थानिक तरुणांकडून केले जाते. विविध फुलांमधून मधमाशांनी गोळा केलेला हा मध 100 टक्के शुद्ध आणि नैसर्गिक असतो.
****
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1661031)
आगंतुक पटल : 229