पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची केली प्रशंसा

Posted On: 27 SEP 2020 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  27 सप्टेंबर  2020

 

आपल्या मन की बात या भाषणात पंतप्रधान म्हणाले, की कोविड च्या कठीण काळात देशातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिकारक्षमता दाखवली.

पंतप्रधान म्हणाले की, जर कृषीक्षेत्र मजबूत असले तर आत्मनिर्भर भारताचा पाया भक्कम राहील.नजीकच्या काळात या क्षेत्रावरील अनेक  निर्बंध मुक्त करण्यात आले असल्याचे आणि मिथकांना छेद  देण्यात  आला असल्याचे त्यांनी  निदर्शनास आणून दिले. हरीयाणातील श्री. कन्वर चव्हाण यांचे उदाहरण देत पंतप्रधानांनी सांगितले, की चव्हाण यांना आपली फळे आणि भाजीपाला मंडईच्या बाहेर विकण्यात अनेक अडचणी येत होत्या, परंतु 2014मधे कृषी उत्पन्न बाजार समिती  कायद्यातून फळे आणि भाजीपाला यांना वगळण्यात आले, याचा चव्हाण यांना खूप फायदा झाला. त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनांची संस्था(Farmer  Producer's Organization) स्थापन केली आणि आता त्यांच्या गावातील शेतकरी  मका आणि त्याच्या  विविध प्रकारांची लागवड करतात (स्वीट काँर्न आणि बेबी काँर्न) आणि  ते उत्पन्न दिल्लीतील आझादपूर मंडईत,मोठ्या किरकोळ साखळी दुकानांत आणि पंचतारांकित हॉटेल्समधून  थेट पुरवितात, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात (कमाईत)कमालीची वाढ झाली आहे.शेतकऱ्यांना आपली फळे आणि भाजीपाला याची विक्री कुणालाही कुठेही  करण्याची मुभा आहे, आणि तो त्यांच्या प्रगतीचा पाया आहे, तसेच  हे तत्त्व देशभरातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांसाठी प्रभावित करत आहे,असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अधोरेखीत केले.

पंतप्रधानांनी श्री.स्वामी समर्थ फार्म प्रोड्यूस कंपनी लिमिटेड या महाराष्ट्रातील कृषी उत्पादन संघटनेचे(फार्म प्रोड्यूसर्स  आँरगनायझेशन) उदाहरण देत सांगितले ,की शेतकऱ्यांना त्यांची फळे आणि भाजीपाला विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पासून परीदृश्य केले आहे.पुणे आणि मुंबई येथील शेतकरी आठवडी बाजार स्वतः चालवीत असून मध्यस्थांशिवाय आपल्या मालाची थेट विक्री करत आहेत,असे त्यांनी नमूद केले.

तामिळनाडू येथील एका केळ्याच्या कृषी उत्पादन संस्थे बद्दल सांगताना पंतप्रधान म्हणाले, की शेतकऱ्यांच्या एक समूहाने टाळेबंदीच्या काळात जवळपासच्या गावांतून शेकडो टन भाजीपाला, फळे आणि केळी  विकत घेतली आणि त्यांना एकत्र बांधून  ती कोम्बो कीट  चेन्नईत विकली .त्यांनी लखनौतील 'इरादा शेतकरी उत्पादक समूह बाबत  उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, या समूहाने, टाळेबंदीच्या काळात थेट शेतकऱ्यांच्या शेतातील फळे आणि भाजीपाला घेऊन मध्यस्थांशिवाय लखनौच्या बाजारात विक्री केली.

नवनिर्माण आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी क्षेत्र अधिक प्रगती करेल,असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. ईस्माईल भाई यांनी घरच्यांचा विरोध पत्करून शेती व्यवसाय स्विकारणाऱ्या गुजरातमधील शेतकऱ्याचे उदाहरणही पंतप्रधानांनी दिले. ईस्माईल भाईंनी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बटाट्याची लागवड केली आणि आणि उत्तम दर्जाचे बटाटे हा त्यांचा हाँलमार्क बनला असून ते देखील आता मध्यस्थांशिवाय आपल्या मालाची थेट विक्री करून उत्तम लाभ मिळवत आहेत. मणिपूरमधील श्रीमती बिजय शांती या महिलेने कमळाच्या देठापासून धागा तयार केल्याच्या स्टार्ट अप कंपनीच्या प्रयत्नांचे कौतुक करत या नाविन्यपूर्ण कल्पकतेने कमळाची लागवड आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रात नवीन वाटा उघडल्या गेल्या असल्याच्या कथेची सर्वांना माहिती दिली.

 

B.Gokhale/S.Patgoankar/ P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659613) Visitor Counter : 232