पंतप्रधान कार्यालय

भारत-श्रीलंका व्दिपक्षीय आभासी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

Posted On: 26 SEP 2020 7:27PM by PIB Mumbai

 

महामहीम पंतप्रधान महिंदा राजपक्क्षे

नमस्कार,

आयुबोवान,

वणक्कम !!

 

महोदय,

या आभासी परिषदेमध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो. नेहमीप्रमाणेच, आपल्या पहिल्या अधिकृत भेटीबद्दल भारतामध्ये  आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आपल्याला हे निमंत्रण कायमच असणार आहे. सध्याची स्थिती लक्षात घेवून आपण आभासी शिखर परिषद घेत आहोत, याचा मला आनंद आहे. या परिषदेचे आपण माझ्या निमंत्रणाचा स्वीकार केला, त्याबद्दल मी आपल्याला खूप धन्यवाद देतो.

आपण पंतप्रधान पद ग्रहण केल्याबद्दलही मी आपले खूप खूप अभिनंदन करतो. संसदीय निवडणुकीमध्ये एसएलपीपीने भरघोस मताधिक्याने विजय मिळवल्याबद्दल मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो.  आपल्या नेतृत्वावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये हजारो वर्षांपासून बहुमुखी ऋणानुबंध  आहेत. आमचे सरकार नेबरहुड फस्टहे धोरण आणि सागर डॉक्ट्रीनयानुसार श्रीलंकेबरोबरच्या संबंधांना विशेष आणि उच्च प्राथमिकता देत आहे.

भारत आणि श्रीलंका बिम्सटेक, आयओआरए, सार्क या व्यासपीठांवरही घनिष्ठ सहयोगी आहेत. आपल्या पक्षाने अलिकडेच विजय मिळवल्यानंतर भारत आणि श्रीलंका संबंधांचा एक नवीन ऐतिहासिक अध्याय सुरू करण्याची संधी आता मिळाली आहे. दोन्ही देशांचे लोक नवीन आशा आणि उत्साहाने आपल्याकडे पाहत आहेत.

मला पूर्ण विश्वास आहे की, आपल्याला मिळालेला भरघोस जनादेश आणि आपल्या धोरणाला संसदेमध्ये मिळत असलेले  उत्तम समर्थन यामुळे आपल्या व्दिपक्षीय सहयोगामुळे सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी मदत मिळेल. आता मी पंतप्रधान राजपक्क्षे यांनी आपले उद्घाटनपर निवेदन करावे, अशी विनंती करतो.

--------

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659401) Visitor Counter : 164