गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
“गरिबांच्या कल्याणासाठी आणि देशसेवेसाठी समर्पित, देशातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात देशाला असा एक नेता लाभला आहे, ज्याने विविध लोककल्याणकारी धोरणांच्या माध्यमातून वंचितांना मुख्य प्रवाहात आणले आहे आणि एका सक्षम भारताची पायाभरणी केली आहे.”
“अनेक दशके आपल्या अधिकारांपासून वंचित राहिलेल्या गरीब नागरिकांना घरे, वीज, बँक खाते किंवा प्रसाधनगृहे प्रदान करणे असो किंवा उज्वला योजनेअंतर्गत गरीब मातांना स्वयंपाकासाठीचा गॅस प्रदान करून त्यांना सन्मानाचे आयुष्य बहाल करणे असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्पित वचनबद्धतेमुळे आणि दृढ संकल्पामुळेच हे सर्व शक्य होऊ शकले आहे.”
“सक्षम, सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समर्पित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतमातेची सेवा करणे, हे निश्चितच सौभाग्याचे आहे.”
“कोट्यवधी देशवासीयांच्या बरोबरीने मी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.”
Posted On:
17 SEP 2020 3:27PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांना शुभेच्छा देताना ते आपल्या ट्विटर संदेशात म्हणतात की, “गरिबांच्या कल्याणासाठी आणि देशसेवेसाठी समर्पित, देशातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात देशाला असा एक नेता लाभला आहे, ज्याने विविध लोककल्याणकारी धोरणांच्या माध्यमातून वंचितांना मुख्य प्रवाहात आणले आहे आणि एका सक्षम भारताची पायाभरणी केली आहे.”
केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणतात की, “अनेक दशके आपल्या अधिकारांपासून वंचित राहिलेल्या गरीब नागरिकांना घरे, वीज, बँक खाते किंवा प्रसाधनगृहे प्रदान करणे असो किंवा उज्वला योजनेअंतर्गत गरीब मातांना स्वयंपाकासाठीचा गॅस प्रदान करून त्यांना सन्मानाचे आयुष्य बहाल करणे असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्पित वचनबद्धतेमुळे आणि दृढ संकल्पामुळेच हे सर्व शक्य होऊ शकले आहे.”
“सक्षम, सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समर्पित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतमातेची सेवा करणे, हे निश्चितच सौभाग्याचे आहे. कोट्यवधी देशवासीयांच्या बरोबरीने मी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो”, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
राष्ट्रसेवा और गरीब कल्याण के प्रति समर्पित देश के सर्वप्रिय नेता प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को जन्मदिन की शुभकामनाएं।
मोदी जी के रूप में देश को एक ऐसा नेतृत्व मिला है जिसने लोक-कल्याणकारी नीतियों से वंचित वर्ग को विकास की मुख्यधारा से जोड़ा और एक मजबूत भारत की नींव रखी।
— Amit Shah (@AmitShah) September 17, 2020
राष्ट्रसेवा और गरीब कल्याण के प्रति समर्पित देश के सर्वप्रिय नेता प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को जन्मदिन की शुभकामनाएं।
मोदी जी के रूप में देश को एक ऐसा नेतृत्व मिला है जिसने लोक-कल्याणकारी नीतियों से वंचित वर्ग को विकास की मुख्यधारा से जोड़ा और एक मजबूत भारत की नींव रखी।
— Amit Shah (@AmitShah) September 17, 2020
M.Chopade/M.Pange/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1655590)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam