वित्त आयोग

15 व्या वित्त आयोगाच्या आर्थिक सल्लागार परिषदेची उद्या बैठक

Posted On: 03 SEP 2020 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  3 सप्टेंबर  2020

 

पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह आणि सदस्य उद्या आयोगाच्या आर्थिक सल्लागार समितीसोबत दिवसभर बैठक घेणार आहेत.

सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ, केंद्र व राज्यांचे कर उत्तेजन, वस्तू आणि सेवा कर भरपाई, महसूली तूट अनुदान आणि वित्तीय एकत्रीकरणावर अंतिम चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्याच्या बैठकीला आर्थिक सल्लागार परिषदेचे खालील सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पिनाकी चक्रवर्ती, डॉ. प्राची मिश्रा, डॉ. ओंकार गोस्वामी, डॉ. सजीद झेड चेनोय, नीलकंठ मिश्रा, डॉ. रथिन रॉय, डॉ. डी के श्रीवास्तव, डॉ. अरविंद विरमणी, डॉ. गोविंदा राव, डॉ. शंकर आचार्य, डॉ. प्रणब सेन, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1651012) Visitor Counter : 224