PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 01 SEP 2020 7:35PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्‍ली-मुंबई, 1  सप्‍टेंबर 2020

 

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला आहे. मुखर्जी यांच्या स्मरणार्थ केंद्रिय मंत्रिमंडळाने दोन मिनिटांचे मौन राखले.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती  

प्रतिदिन 60,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचा सलग पाच दिवस चाललेला कल कायम ठेवत, गेल्या चोवीस तासात भारतात 65,081 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 28,39,882 असून त्यानुसार कोविड-19 च्या रुग्णांचा बरे होण्याचा दर आणखी वाढून 77% झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 3.61 पटीने जास्त आहे.

भारतात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 7,85,996 असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 20.53 लाखाहून जास्त आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येपेक्षा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या चार पट वाढली आहे.

गेल्या 24 तासात पाच राज्यांमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. ती आकडेवारी पुढीलप्रमाणे :

  • महाराष्ट्र -11,852
  • आंध्रप्रदेश - 10,004
  • कर्नाटक - 6,495
  • तामिळनाडू - 5,956
  • उत्तर प्रदेश - 4,782

या पाच राज्यांमधील रुग्णांची एकूण संख्या गेल्या 24 तासात देशभरात आढळलेल्या नवीन रुग्णांच्या संख्येच्या 56% आहे.

या पाच राज्यांमध्ये गेल्या चोवीस तासात सर्वाधिक रुग्ण बरे होऊन घरी पाठवल्याचीही नोंद झाली असून ती संख्या देशभरातल्या 65,081 बरे झालेल्या रुग्णांच्या 58.4% आहे. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 11,158 रुग्ण बरे झाले असून आंध्र प्रदेशात 8,772, कर्नाटकात 7,238 , तामिळनाडूत 6008, तर उत्तर प्रदेशात 4,597 कोविड रुग्ण बरे झाले आहेत.

वरील पाच राज्यांमध्ये मिळून गेल्या चोवीस तासात एकूण 536 मृत्यूची नोंद झाली असून देशभरात झालेल्या एकूण मृत्यूच्या संख्येच्या(819) तुलनेत हे प्रमाण 65.4% आहे. महाराष्ट्रात 184 मृत्यू नोंदवले गेले, तर कर्नाटकात 113 , त्याखालोखाल तामिळनाडूत 91, आंध्रप्रदेशात 85, तर उत्तर प्रदेशात 63 मृत्यूची नोंद झाली आहे.

 

भारताच्या एकत्रित चाचण्यांच्या संख्येने आज 4.3 कोटींचा  (4,33,24,834) टप्पा पार केला आहे. गेल्या दोन आठवड्यात तब्बल 1,22,66,514 चाचण्या घेण्यात आल्या. राज्ये / केंद्रशासित प्रदेश त्यांची चाचणी क्षमता वाढवत आहेत. एकूण चाचण्यांमध्ये जास्तीत जास्त योगदान देणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. एकूण चाचण्यांपैकी सुमारे  34% चाचण्या या तीन राज्यांनी केल्या आहेत. भारताच्या प्रतिदिन  चाचणी क्षमतेने 10 लाख चाचण्याचा टप्पा  पार केला आहे.  गेल्या 24 तासांत 10,16,920 चाचण्या घेण्यात आल्या.

 

दिनांक 1 सप्‍टेंबर 2020 रोजी राज्‍य / केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये कोविड रुग्‍णांच्‍या संख्‍येतील वाढ, रुग्‍ण बरे होण्‍याची, मृत्‍युंची आकडेवारी इथे पाहता येईल.

 

इतर

 

महाराष्ट्र अपडेट्स

सोमवारी  नोंद झालेल्या 1,935 नवीन केसेस सहित  एकूण 1,75,105 केसेस नोंद करून पुण्याने दिल्लीला रुग्ण संख्येमध्ये मागे टाकले आहे. दिल्लीमध्ये एक 1.74 लाख केसेस नोंद झाल्या आहेत. मुंबईची रुग्णसंख्या 1.45 लाख आहे.  पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 52,172 आहे. महाराष्ट्राने सोमवारी 11,852 नवीन केसेस नोंद केल्या त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 7,92,541 झाली आहे. या दरम्यान राज्य सरकारने राज्याअंतर्गत वाहतुकीवरील निर्बंध हटवले आहेत आणि  ई-पास ची आवश्यकता देखील रद्द केली आहे.

 

FACT CHECK

* * *

MC/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650450) Visitor Counter : 183