आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा ओलांडला- एका दिवसात आत्तापर्यंत विक्रमी चाचण्या
गेल्या 24 तासांमध्ये 10.5 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या कोविड चाचण्या
जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष- प्रतिदिनी 140 पेक्षा जास्त चाचण्या
प्रविष्टि तिथि:
30 AUG 2020 5:11PM by PIB Mumbai
देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक आहे, या रोगाविरुद्ध भारताने आपला लढाही तीव्र केला आहे. या लढ्यामध्ये भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा ओलांडला असून एका दिवसात आत्तापर्यंत विक्रमी चाचण्या केल्या. देशात गेल्या 24 तासांमध्ये 10.5 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या.
देशात गेल्या 24 तासांमध्ये 10,55,027 जणांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. भारताने आता दररोज 10 लाखांपेक्षा जास्त नमुने तपासण्याची- राष्ट्रीय निदान क्षमता अधिक बळकट केली आहे.
भारतामध्ये आत्तापर्यंत एकूण 4.14 कोटी (4,14,61,636)चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोविड-19 विषयाचा जागतिक संदर्भ लक्षात घेवून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांशी समन्वय साधून भारत सरकारने कोविडविरुद्ध लढा देण्यासाठी ‘टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट’ हे धोरण तयार केले आहे. यामध्ये चाचण्या करून संबंधित रूग्णांचे विलगीकरण तसेच आवश्यकतेप्रमाणे उपचार केले जात आहेत. चाचण्या करण्याचे आक्रमक धोरण राबविण्यात येत असल्यामुळे कोविड-19 ची बाधा झालेल्या रूग्णांना तातडीने उपचार सुनिश्चित केले जात आहेत. तसेच रूग्णांशी कार्यक्षमतेने संपर्क साधून त्यांच्या उपचाराविषयी जागरूकता दाखवून पाठपुरावा केला जात आहे. सौम्य आणि किरकोळ, मध्यम बाधित रूग्णांना घरामध्ये त्वरित अलगीकरणामध्ये ठेवण्यात येत आहे. तसेच गंभीर रूग्णांना तातडीने रूग्णालयामध्ये भरती करण्यात येत आहे.
चाचण्यांचे प्रमाण वेगाने वाढविण्यात आल्यामुळे प्रति दशलक्ष चाचण्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज हे प्रमाण 30,044 आहे.
कोविड-19 च्या संदर्भामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय योजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य निकष लावले आहेत. यानुसार संशयित कोविड-19 रूग्णांविषयी सर्वंकष दक्षता बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष- प्रतिदिनी 140 पेक्षा जास्त चाचण्या करणे आवश्यक आहे. यानुसार देशात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. अनेक राज्यांनी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त चाचण्या करून चांगली कामगिरी केली आहे.

चाचणी धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळांचे जाळे विस्तारण्यात आले आहे. आज देशातल्या 1003 सरकारी प्रयोगशाळांमध्ये आणि 580 खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या, तपासणी होत आहे. तसेच देशभरामध्ये 1583 ठिकाणी सर्वंकष चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, यामध्ये:-
· रिअल टाइम रॅपिड टेस्ट आधारित चाचणी प्रयोगशाळा –811 (सरकारी - 463 + खासगी 348)
- ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा - 651 (सरकारी - 506 + खासगी - 145)
- सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा –121 (सरकारी - 34 + खासगी 87)
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना पाहायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva .
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (टोल फ्री). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
****
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1649800)
आगंतुक पटल : 273
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam