आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने सलग दुसऱ्या दिवशी 9 लाखांहून अधिक कोविड नमुन्यांची चाचणी घेतली
एकूण चाचण्यांची संख्या 4 कोटींच्या नव्या शिखराजवळ
गेल्या दोन आठवड्यात 1 कोटींहून अधिक लोकांच्या चाचण्या
Posted On:
28 AUG 2020 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020
केंद्र सरकारच्या “तपासण्या, ओळख आणि उपचार” रणनीतिवर लक्ष केंद्रित करत देशात सलग दुसऱ्या दिवशी कोविड-19 च्या नऊ लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली.भारताने याआधीच कोविड-19 च्या दररोज दहा लाख चाचण्यांची क्षमता निर्माण केली आहे. गेल्या 24 तासात 9,01,338 नमुने तपासण्यात आले.
या वेगवान चाचण्यांमुळे देशात आतापर्यन्त कोविड-19 च्या एकूण सुमारे चार कोटी नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यन्त 3.94,77,848 नमुने तपासण्यात आले. गेल्या दोन आठवड्यात कोविड-19 च्या 1 कोटींहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.
प्रति दहा लाख लोकांच्या चाचण्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असून ही संख्या 28,607 वर गेली आहे. केवळ आक्रमक चाचणीद्वारेच प्रारंभिक टप्प्यावर बाधीत रुग्ण ओळखता येतात. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेता येतो, आणि त्यांचे अलगीकरण करून वेळेवर आणि प्रभावी उपचार केले जाऊ शकतात.
वर्गीकृत आणि सातत्यपूर्ण प्रतिसादाचा परिणाम म्हणून चाचणीची रणनीती तयार झाली आहे ज्याने देशातील चाचणीचे जाळे निरंतर विस्तरले आहे. या धोरणाच्या मदतीने देशातील चाचणी प्रयोगशाळेचे जाळे मजबूत केले गेले आहे ज्यात आजपर्यंत देशातील 1564 प्रयोगशाळा आहेत; सरकारी क्षेत्रात 998 आणि 566 खासगी प्रयोगशाळांचा यात समावेश आहे.
- रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 801: (शासकीय 461+ खासगी : 340)
- ट्रू नॅट आधारित चाचणी चाचणी प्रयोगशाळा 643 : (शासकीय : 503 + खासगी 140)
- सीबीएनएएटी आधारित प्रयोगशाळा : 120 (शासकीय : 34 + खासगी : 86)
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649361)
Visitor Counter : 215
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam