आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
एकूण कोविड रुग्णांपैकी केवळ 22% सक्रिय रुग्ण
26 लाख रुग्ण बरे झाले
बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 18 लाखांनी जास्त
Posted On:
28 AUG 2020 1:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020
केंद्र सरकारच्या ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ धोरणानुसार देशात रुग्ण बरे होण्याचा दर सतत सुधारत आहे तर मृत्यू दर कमी होत आहे. गेल्या पाच महिन्यांत, कोविड-19 चे 3/4 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत आणि आता 1/4 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण बरे होत असल्यामुळे तसेच गृह विलगीकरणासाठी (रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे) रुग्णालयातून घरी सोडण्यात येत आहेत, त्यामुळे भारतात कोविड-19 चे सुमारे 26 लाख रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 76.28 टक्के इतका झाला आहे.
बरे झालेल्या रुणांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 3.5 पट आहे, म्हणजेच एकूण रुग्ण संख्येच्या 21.90 टक्के आहे. बरे होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत देखील सातत्याने वाढत आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 18 लाखांनी जास्त झाली असून ती आता 18,41,925 इतकी झाली आहे.
घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर जोर दिल्यामुळे चाचण्यांमध्ये वाढ करून बाधित रुग्ण लवकर शोधण्यात मदत होत आहे. त्यामुळे बाधित रुग्ण आढळल्यास त्यांना त्वरित गृह विलगिकरण किंवा रुग्णालयात दाखल केले जात आहे. रुग्णांमध्ये सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे असल्यास त्यांना गृह अलगिकरणात तर गंभीर स्वरूपाची लक्षणे असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहेत.
केंद्र सरकारने कोविड व्यवस्थापनासाठी रुग्णालय सुविधांवर भर दिला आहे. यासाठी सरकारने देशभरात तीन पातळ्यांवर कोविड व्यवस्थापन सुविधा सुरू केल्या आहेत. गंभीर रुग्णांसाठी आयसीयू खाटा आणि व्हेंटिलेटर सह कोविड समर्पित रुग्णालय, ऑक्सिजन बेड आणि 'डॉक्टर ऑन कॉल' सुविधा यासह कोविड आरोग्य केंद्र आणि अलगिकरण खाटांसह कोविड केअर केंद्र सुरू आहेत. देशात सध्या 15,89,105 अलगीकरण खाटा, 2,17,128 ऑक्सिजन बेड, 57,380 आयसीयू बेड सह 1723 कोविड समर्पित रुग्णालय, 3883 कोविड समर्पित आरोग्य केंद्र आणि 11,689 कोविड केअर केंद्र आहेत. बाधित रुग्णांवरील परिणामकारक उपचारामुळे कोविड मुळे होणारे मृत्यू कमी झाले आहेत.कोविड मृत्यू दरात मोठ्या प्रमाणावर घट होऊन तो आज 1.82% इतका झाला आहे.
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.
U.Ujgare/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649180)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam