आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
बरे होणाऱ्या रुग्ण संख्येतील वाढीबरोबरच त्याचा सक्रीय रुग्ण संख्येपासूनचा फरक वाढला
सक्रिय रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3.5 पटीने जास्त
Posted On:
26 AUG 2020 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2020
भारतातल्या सक्रिय रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज 3.5 पटीपेक्षाही जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,000 पेक्षा जास्त राहिली आहे. गेल्या 24 तासात कोविड-19 चे 63,173 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 24,67,758 झाली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी व सक्रिय रुग्णांच्या टक्केवारीतील फरकही झपाट्याने वाढतो आहे.

सक्रिय रुग्ण संख्येच्या तुलनेत(7,07,267) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 17,60,489 ने जास्त आहे. याबरोबरच भारतातील बरे होणाऱ्या कोविड रुग्णांची टक्केवारी आज 76% च्या वर (76.30%) गेली आहे.
बरे होणाऱ्या रुग्णांच्या विक्रमी संख्येमुळे प्रत्यक्ष कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येचा भार कमी होण्यास, म्हणजेच सक्रीय रुग्णांची संख्या आणखी कमी होण्यास मदत झाली आहे. एकूण पॉझिटिव रुग्णांच्या तुलनेत या सक्रिय रुग्णांची संख्या फक्त 21.87% आहे.
केंद्र, राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी एकत्रितपणे राबवलेल्या धोरणांच्या अंतर्गत आक्रमक पद्धतीने कोविड चाचण्या केल्यामुळे असे रुग्ण लवकर सापडत असून त्यानंतर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे कार्यक्षम वैद्यकीय व्यवस्थापनही होत असल्याने मृत्यूदर सतत खाली येत आहे. तो आज 1.84 % असून स्थिरगतीने कमी होत आहे.
माहितीसाठी तसेच तांत्रिक अडचणी, मार्गदर्शन आणि सूचनांसाठी कृपया नियमितपणे खालील संकेतस्थळाला भेट द्या- https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
कोविडच्या संबंधात तांत्रिक शंकां निरसनासाठी technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर प्रश्नांसाठी ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva. इथे संपर्क करा.
कोविडसंबंधात कुठल्याही प्रश्नासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला खालील हेल्पलाईन नंबर वर फोन करा-+91-11-23978046 or 1075. कोविड संबंधित माहिती साठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे दूरध्वनी क्रमांक या संकेत स्थळावर मिळू शकतील:
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
* * *
B.Gokhale/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648730)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam