आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
एका दिवसातील रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक; गेल्या 24 तासात 66,550 रुग्णांची कोविडवर मात
भारताने अजून एक शिखर गाठले : रोगमुक्तांचा एकूण आकडा 24 लाखांच्या पार
गेल्या 25 दिवसांमध्ये रोगमुक्तांच्या संख्येतील वाढ 100 टक्के
Posted On:
25 AUG 2020 1:38PM by PIB Mumbai
केंद्र सरकार आणि राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी राबवलेल्या सामुहिक आणि धोरणात्मक उपाययोजनांचे योग्य परिणाम दिसून येत आहेत.
दिवसभरातील कोविड रोगमुक्तीचा नवा उच्चांक आज भारताने नोंदवला आहे. 66,550 कोविडबाधित गेल्या 24 तासांमध्ये रोगमुक्त होऊन रुग्णालयातून बाहेर पडले आहेत. अग्रक्रमाने चाचण्या, सर्वंकष ट्रॅकिंग आणि परिणामकारक औषधोपचार यामुळे रोगमुक्तांचा एकूण आकडा 24 लाखांना पार करून गेला आहे (24,04,585)
याबरोबरच भारतात कोविड-19 रुग्णांचे रोगमुक्त होण्याचे प्रमाण 76% (75.92%) वर पोचले आहे. आजारातून बरे झालेल्यांची संख्या बाधितांपेक्षा(7,04,348) लक्षणीयरित्या म्हणजे 17 लाखांहून जास्त आहे. आजच्या दिवशी रोगमुक्तांचे प्रमाण उपचाराधिन रुग्णांच्या 3.41 पट आहे.
गेल्या 25 दिवसांमध्ये रोगमुक्तांच्या प्रमाणात 100%अशी लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

रोगमुक्तांची ही विक्रमी संख्या देशातील वास्तविक रुग्णांची संख्या कमी झाल्याची खात्री दर्शवते. म्हणजेच आता बाधित असलेल्यांची एकूण संख्या कमी होऊन एकूण बाधित झालेल्यांच्या रुग्णसंख्येच्या 22.24%एवढीच आहे.
केंद्र सरकार आणि राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांनीएकत्रितपणे वैद्यकीय चाचण्यांमधून आजाराची निश्चिती, देखरेख आणि संसर्ग-संपर्काचा माग काढणे याशिवाय गृह वा संस्था विलगीकरण, यासोबतच सुधारित वैद्यकिय पायाभूत सुविधांमुळे वेळच्यावेळी सुधारित उपचार अश्या उद्दिष्टकेंद्री व परिणामकारक उपाययोजना कोविडसाठी राबवल्या. यामध्ये समर्पित कोविड केअर संस्था, समर्पित कोविड आरोग्य संस्था आणि समर्पित कोविड रुग्णालये यांचा समावेश आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी अपेक्षित परिणाम दाखवले. सातत्याने घटत असलेला मृत्यूदर आज 1.84% होता.
तांत्रिक बाबी, सूचना आणि सल्ले या कोविड-19 संबधीत सर्व सत्य आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया नियमितपणे https://www.mohfw.gov.in/ and @MoHFW_INDIA इथे भेट द्या.
कोविड-19 शी संबधीत तंत्रज्ञानविषयक आपल्या शंका आपण technicalquery.covid19[at]gov[dot]in ला पाठवू शकता आणि इतर शंका ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva इथे विचारू शकता .
कोविड-19 बद्दलच्या कोणत्याही शंका आपण आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय हेल्पलाईन क्रमांक +91-11-23978046 किंवा 1075 (टोल-फ्री). राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचे कोविड-19 साठीच्या क्रमांकांची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf येथे उपलब्ध आहे
U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648437)
Visitor Counter : 340
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam