आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतामध्ये 23 लाखांपेक्षा जास्त कोरोनारूग्ण झाले बरे


सक्रीय  रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण तिप्पट

सक्रीय रूग्णांपेक्षा 16 लाख जास्त रूग्ण झाले बरे

Posted On: 24 AUG 2020 3:21PM by PIB Mumbai

 

भारतामध्ये बरे झालेल्या कोविड रूग्णांची संख्या आज 23 लाखांपेक्षा जास्त आहे. अनेक रूग्ण कोरोना आजारातून पूर्णपणे बरे होत आहेत. त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात येत आहे. (तसेच अगदी किरकोळ, सौम्य आणि मध्यम प्रकारची लागण झालेल्या रुग्णांना घरामध्येच विलग ठेवण्यात आले आहे. तेही बरे झाले आहेत.)

देशभरामध्ये कोविड-19 चा उद्रेक झाल्यानंतर  सरकारने चाचण्या करण्याचे प्रमाण अतिशय आक्रमकपणे वाढविले, त्याचा परिणाम चांगला दिसून येत आहे. चाचणी, पाठपुरावा आणि उपचार या तीन गोष्टींची सर्वंकष दक्षता घेवून अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे देशातला कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचा आकडा 23,38,035 पर्यंत पोहोचला आहे.  वैद्यकीय उपचार सेवेचे प्रमाणिकरण करण्यात आले आहे. ऑक्सिजनचा नियमित पुरवठा होत आहे काय , हे कसोशीने पाहणे, अतिदक्षता विभाग आणि रूग्णालयांमधले कुशल वैद्यकीय पथक करीत असलेले कार्य, यामुळे कोरोनाग्रस्त लवकर बरे होत आहेत. तसेच रूग्णवाहिका सेवा सुधारण्यात आली आहे. डॉक्टरांकडून आरोग्य सेवा प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे. त्यामुळे गंभीर  कोविड रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारले आहे. घरामध्येच विलगीकरणामध्ये असलेले रूग्ण लवकर बरे होत आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये 57,469 कोरोनाचे रूग्ण बरे झाले आहेत. भारतामध्ये कोविड-19 रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. (75.27 टक्के) गेल्या काही महिन्यांपासून बरे होत असलेल्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

भारतामध्ये 16 लाखांपेक्षा जास्त (16,27,264) रूग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या 7,10,771 आहे. (या रूग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत). कोरोनाबाधित होण्याच्या प्रमाणातही  घट होत असल्यामुळे सक्रिय प्रकरणे कमी झाली. सध्या कोरोना सकारात्मक प्रकरणांचे प्रमाण 22.88 टक्के आहे. त्याचबरोबर कोरोना मृत्यूदरामध्येही घट झाली आहे. वैद्यकीय सुविधांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आणि अतिदक्षता विभागांमुळे कोरोना रूग्णांच्या मृत्यूदरामध्ये घट झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सक्रिय सहकार्याने नवी दिल्लीच्या एम्सच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल ई-आयसीयू ऑन कोविड-19’ या व्यवस्थापकीय योजनेमुळे भारतामधल्या कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सुधारले आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरात घट आली आहे. या राष्ट्रीय स्तरावरील ई-व्यवस्थापनाचे आयोजन आठवड्यातून दोनवेळा- म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी करण्यात येत आहे. यामध्ये सर्व राज्यांतल्या कोविड रूग्णालयांमधल्या अतिदक्षता विभागातल्या वैद्यकीय पथकाला समाविष्ट करून घेण्यात येते. तसेच  कोविड उपचाराविषयी सर्वांना पडत असलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात. आरोग्य मंत्रालयामार्फत आत्तापर्यंत अशा प्रकारे 14 राष्ट्रीय ई-आयसीयू व्यवस्थापन केले आहे. त्यामध्ये देशभरातल्या 22 राज्यांतल्या 117 रूग्णालयांमधल्या वैद्यकीय पथकांना समावून घेण्‍यात आले आहे.

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना पाहायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in  आणि @CovidIndiaSeva .

कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (टोल फ्री). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf   

 

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648181) Visitor Counter : 249