अर्थ मंत्रालय

1,02,065 कोटी रुपयांची पत मर्यादा असलेली 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्ड्स विशेष परिपूर्णता मोहिमे अंतर्गत मंजूर

Posted On: 20 AUG 2020 2:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑगस्‍ट 2020

 

कोविड-19 मुळे बसलेल्या धक्क्यातून उभारी मिळावी या हेतूने विशेष परिपूर्णता मोहिम राबवली जात आहे. याद्वारे किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. 17.08.2020 पर्यंत 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्डस मंजूर झाली आहेत. त्यांची एकूण कर्ज मर्यादा 1,02,065 कोटी रुपये आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उभारी धरेल आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला गती येईल. 

आत्मनिर्भर भारत मोहिमेचाच हा एक भाग आहे असे म्हणता येईल, सरकारने 2 लाख कोटी रुपयांच्या सवलतीच्या दरातील कर्जाची सोय करण्याची घोषणा ‘आत्मनिर्भर भारत‘ अंतर्गत केली होती. एकूण 2.5 कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दुग्धउत्पादकांना याचा लाभ मिळेल. 


* * *

U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1647237) Visitor Counter : 331