गृह मंत्रालय

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा


या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आणि जास्तीत जास्त मेक इन इंडिया उत्पादनांचा उपयोग करत भारताला नव्या शिखरावर नेण्यासाठी योगदान देण्याचे केले आवाहन

Posted On: 15 AUG 2020 5:30PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.74व्या स्वातंत्र्य दिनी त्यांनी  नवी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी राष्ट्र ध्वज फडकवला.

आपला पराक्रम आणि बलिदानाने देशालास्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसेनांनीना कोटी कोटी प्रणाम त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांनाही नमन करत असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

ज्या स्वतंत्र, बलवान आणि स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी ते साकारत आहेत. एकीकडे मोदी सरकारने, गरीब, वंचित वर्गाला घर,वीज,आरोग्य विमा यासारख्या सुविधा पुरवल्याआहेत तरदुसरीकडे भारतालाएक मजबूत राष्ट्र बनवले आहे.

या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होऊ याआणिजास्तीत जास्त  मेक इन इंडिया उत्पादनांचाउपयोग करत  भारताला नव्या शिखरावर नेण्यासाठी योगदान देऊ या, असेआवाहन त्यांनी देशवासियांना केले आहे.

M.Iyangar/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646125) Visitor Counter : 165