गृह मंत्रालय

स्वातंत्र्यदिन 2020 निमित्त 926 पोलिस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान

प्रविष्टि तिथि: 14 AUG 2020 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2020

 

स्वातंत्र्यदिन 2020 निमित्त एकूण 926 पोलिस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात आली आहेत. 215 पोलिस कर्मचार्‍यांना शौर्य (पीएमजी) पोलिस पदके देऊन गौरवण्यात आले. अतुलनीय सेवेसाठी 80 पोलिस कर्मचार्‍यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक आणि गुणवंत सेवेसाठी 631 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलिस पदक प्रदान करण्यात आले.

215 शौर्य पुरस्कारांपैकी बहुतांश 123 कर्मचाऱ्यांना जम्मू-काश्मीरमधील धाडसी कारवाईसाठी, 29 पोलिसांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या कारवाईबद्दल आणि 8 कर्मचाऱ्यांना ईशान्य प्रदेशातील कारवाईबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शौर्य पुरस्कार प्राप्त झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये 55 जण सीआरपीएफचे आहेत, 81 जण जम्मू-काश्मीर पोलिसांपैकी आहेत,  23  जण उत्तर प्रदेशचे, 16 जण दिल्ली पोलिसांपैकी आहेत, 14 जण महाराष्ट्रातील आणि 12  जण झारखंडचे आहेत तर उर्वरित इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील आहेत.  

पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा


* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1645761) आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , Tamil , Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Gujarati , Odia , Telugu , Malayalam