पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान उद्या राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन करणार
Posted On:
07 AUG 2020 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या म्हणजेच 8 ऑगस्ट 2020 रोजी स्वच्छ भारत अभियानावरील राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. हे केंद्र म्हणजे महात्मा गांधी यांना श्रद्धांजली आहे. गांधीजींच्या चंपारण सत्याग्रह शताब्दी उत्सवानिमित्त पंतप्रधानांनी प्रथम 10 एप्रिल 2017 रोजी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची घोषणा केली होती.
आरएसके येथील प्रतिष्ठान भविष्यातील पिढ्यांना जगातील सर्वात मोठ्या वर्तन बदल अभियानाच्या अर्थात स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी प्रवासाची ओळख करून देतील. आरएसकेमध्ये डिजिटल आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून स्वच्छता आणि त्यासंबंधी बाबींविषयी माहिती, आणि शिक्षण दिलं जाईल तसेच जागरूकता निर्माण केली जाईल.
यासाठी संवादात्मक स्वरूपात एकात्मिक शिक्षण, सर्वोत्तम पर्याय, ग्लोबल बेंचमार्क, यशोगाथा आणि संकल्पनांवर आधारित संदेश यांचे सादरीकरण केले जाईल.
हॉल 1 मध्ये, अभ्यागतांना एक अनोखे 360अंश कोनातील ऑडिओ व्हिज्युअल सादरीकरण पाहायला मिळेल, जे भारताच्या स्वच्छता कथेचे वर्णन करेल- जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वर्तन बदल अभियानाचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. हॉल 2 मध्ये बापूजींच्या स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या कार्याची कथा सांगण्यासाठी एलईडी पॅनेल्स, होलोग्राम बॉक्स, खेळ आणि इतर बऱ्याच गोष्टींचा यात समावेश करण्यात आला आहे. आरएसकेला लागून असलेल्या हिरवळीच्या मोकळ्या जागेत सत्याग्रह ते स्वच्छाग्रह या भारत प्रवासातील गाथा दर्शविणारी तीन प्रदर्शने दर्शविली जातील. केंद्राभोवतीच्या कलात्मक भिंतीवरील भित्तीचित्र देखील अभियानाच्या यशाचे मुख्य घटक दिसणार आहेत.
आरएसकेचा दौरा केल्यानंतर, पंतप्रधान आरएसकेच्या अॅम्फिथेटरमध्ये, 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दिल्लीतील 36 शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. यावेळी सामाजिक अंतर नियमांचे पालन करण्यात येईल. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतील.
स्वच्छ भारत अभियानाने भारतातील ग्रामीण स्वच्छतेत बदल घडवून आणला आहे आणि 55 कोटीहून अधिक लोकांच्या उघड्यावर शौच करण्याच्या मानसिकतेत बदल केला आहे आणि आता ही जनता स्वच्छतागृहाच वापर करत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून भारताचे खूप प्कौतुक होत आहे आणि आपण उर्वरित जगासाठी एक उदाहरण ठेवले आहे. हे अभियान आता दुसऱ्या टप्प्यात असून भारताची गावे उघड्यावरील शौच अर्थात ओपन डेफिकेशन फ्री (ओडीएफ) ते ओडीएफ प्लस पर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे.
U.Ujgare/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644073)
Visitor Counter : 252
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam