आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने 2 कोटीपेक्षा जास्त कोविड चाचण्या करत मैलाचा टप्पा केला पार
दहा लाख लोकांत 14,640 चाचण्या
Posted On:
03 AUG 2020 8:28PM by PIB Mumbai
भारताने आतापर्यंत 2,02,02,858 कोविड-19 चाचण्या पूर्ण करत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आक्रमकतेने चाचण्या करणे, कार्यक्षमतेने माग काढणे ,विलगीकरण आणि त्वरित उपचार या केंद्रसरकारच्या महत्वपूर्ण धोरणाचा वापर कोविड-19च्या व्यवस्थापनासाठी करत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी याचा अवलंब केल्याने हे शक्य झाले आहे. या धोरणाच्या प्रभावी कार्यवाहीमुळे देशभरातील कोविड चाचण्यांचा वेग वाढला असून व्यापक प्रमाणात लोकांना या चाचण्यांचा लाभ घेता येत आहे.
गेल्या 24 तासांत 3,81,027 चाचण्या पूर्ण झाल्या असून, दर दहा लाखांत 1,4640 इतका या चाचण्यांचा (IPM) वेग वाढला आहे.देशात सध्या दर दहा लाखांत 14,460 इतक्या चाचण्या होत आहेत. देशातील चाचण्यांचा(TPM) वेग सातत्याने वाढत असताना 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात हा दर देशातील सरासरीपेक्षा जास्त आहे.
देशातील प्रयोगशाळांचे जाळे मजबूत करण्यात येत असून देशात आता एकूण 1348 प्रयोगशाळा असून त्यापैकी 914 सरकारी तर 434खाजगी आहेत. त्या खालीलप्रमाणे
● रीअल टाईम आरटी पीसीआर आधारित प्रयोगशाळा: 686 (सरकारी :418+ खाजगी :268)
● ट्रू नँट आधारित प्रयोगशाळा:556 (सरकारी:465 + खाजगी: 91)
● सीबीनअँअँट आधारित प्रयोगशाळा:(सरकारी :31+ खाजगी:75)
कोविड-19 बाबतच्या तांत्रिक मार्गदर्शक तत्वे आणि सूचनांच्या सुयोग्य आणि ताज्या माहिती करीता पहा: --For all authentic & updated information on COVID-19 related technical issues, guidelines & advisories please regularly visit: https://www.mohfw.gov.in/ and @MoHFW_INDIA.
तांत्रिक बाबतीत प्रश्न यावर पाठवू शकाल Technical queries related to COVID-19 may be sent to technicalquery.covid19[at]gov[dot]in and other queries on ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva .
इतर कोणत्याही माहितीसाठी In case of any queries on COVID-19, please call at the Ministry of Health & Family Welfare helpline no.: +91-11-23978046 or 1075 (Toll-free). List of helpline numbers of States/UTs on COVID-19 is also available at https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
****
M.Iyangar/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643234)
Visitor Counter : 186
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam