PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
02 AUG 2020 6:53PM by PIB Mumbai
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
दिल्ली-मुंबई, 2 ऑगस्ट 2020
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन
देशासमोरच्या आव्हानांवर अनेक तोडगे काढण्यासाठी विद्यार्थी काम करत असल्याचे पंतप्रधानांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या ग्रँड फिनालेला संबोधित करताना सांगितले. समस्यांवर उपाय पुरवण्याबरोबरच डाटा, डीजीटायझेशन आणि हाय टेक भविष्य याबाबत भारताच्या आकांक्षाही ते मजबूत करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 21 व्या शतकाची जलद गती जाणून घेत प्रभावी भूमिका बजावणे सुरूच ठेवण्यासाठी भारताने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नवोन्मेश, संशोधन, विकास आणि उद्योजकता यासाठी आवश्यक परीरचना देशात उभारण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भारताचे शिक्षण अधिक आधुनिक करणे आणि नैपुण्याला अधिक संधी निर्माण करणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
गेल्या 24 तासात 51,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. 51,225 रुग्ण बरे होऊन घरी सोडले असून कोविड-19 मधून बरे झालेल्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या सध्या 11,45,629 एवढी आहे. गेल्या 24 तासात एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्ण बरे झाले असून परिणामी रुग्ण बरे होण्याचा दर 65.44% या नवीन उच्चांकापर्यंत पोहोचला आहे. याचाच अर्थ असा की जास्तीत जास्त कोविड-19 चे रुग्ण उपचारानंतर बरे होऊन त्यांना सुट्टी दिली जात आहे.
इतर अपडेट्स:
- देशभर असलेल्या महामारीच्या व्यवस्थापनात, आठवडा ते महिना या काळात होणाऱ्या संसर्गाच्या संभाव्य संख्येचा अंदाज लावणे आणि या आकड्याचा वापर करून देशातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींचे पूर्वानुमान लावणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अडव्हान्स सायन्टिफिक रिसर्च (जेएनसीएएसआर), आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) यांनी मिळून कोविड-19 चा प्रारंभिक टप्प्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि धोरण ठरविण्यासाठी एक मॉडेल विकसित केले आहे.
- भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच, रेल्वे मंत्रालयाने 31 जुलै 2020 रोजी सेवानिवृत्त झालेल्या 2320 अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. कोविड काळात मालवाहतूक रेल्वे, पार्सल, श्रमिक विशेष रेल्वे चालवण्यात आल्या. संक्रमण परिस्थितीत देशसेवा करण्यासाठी रेल्वेने सर्वतोपरी प्रयत्न केले. रेल्वे कर्माचारी कोरोना योद्ध्यांपेक्षा कमी नाहीत. कोविड विरोधातील लढाईत प्रयत्नांची शर्थ केल्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो” असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल याप्रसंगी म्हणाले.
- भारताला अगरबत्ती उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने (केव्हीआयसी) प्रस्तावित केलेल्या अनोख्या रोजगार निर्मिती कार्यक्रमास केंद्रिय सूक्ष, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री (एमएसएमई) नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. "खादी अगरबत्ती आत्मनिर्भर मोहीम" नावाच्या या कार्यक्रमाचा उद्देश देशातील वेगवेगळ्या भागात बेरोजगार आणि स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि देशांतर्गत अगरबत्ती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविणे हे आहे.
- केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी महाराष्ट्रातील अकोला येथे बीएसएनएलच्या भारत एअर फायबर हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवेचे केले उद्घाटन. बीएसएनएलने जुलै,2020 महिन्यात महाराष्ट्र परिमंडळात सुमारे 14,500 एफटीटीएच कनेक्शन दिले आहेत. बीएसएनएलने कोविड कंट्रोल रूम्स, जिल्हा कोविड रुग्णालये, हेल्पलाईन व देशभरातील कॉल सेंटर्सना चोवीस तास हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन दिले आहे.
-
-
- थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त ‘लोकमान्य टिळक- स्वराज ते आत्मनिर्भर भारत’ या दोन दिवसाच्या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन.
महाराष्ट्र अपडेट्स :
अनलॉक 3.0 टप्प्याच्या नियमांप्रमाणे, महाराष्ट्रात सुमारे साडेचार महिन्यांनंतर 5 ऑगस्टपासून मॉल खुले होतील. 75 मोठ्या मॉल्सपैकी निम्मे मॉल्स मुंबई महानगर कार्यक्षेत्रात येतात. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 अशी मॉल्सची वेळ असणार आहे, ग्राहकांचा प्रतिसाद अल्पच राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 1.49 लाख सक्रीय रुग्ण असून आतापर्यंत 15,316 मृत्यूंची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 10,725 रुग्ण बरे झाले, तर 9,761 नवीन रुग्णांची नोंद झाली.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643071)
Visitor Counter : 311
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam