आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात एकूण 1.82 कोटी नमुन्यांची चाचणी
प्रतिदशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या वाढून 13,181 वर पोहोचली
21 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील चाचण्यांच्या अहवालात 10% पेक्षा कमी लोक कोरोना बाधित
Posted On:
30 JUL 2020 8:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2020
कोविड-19 बाधित रुग्णांची लवकर ओळख पटावी आणि त्यांचे अलगीकरण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या एकत्रित आणि केंद्रित प्रयत्नांमुळे देशभरात जलद गतीने चाचण्या घेण्यात येत आहेत. आयसीएमआरच्या विकसित होणार्या चाचणी धोरणामुळे संपूर्ण भारतातील चाचणी नेटवर्क विस्तृत झाले आहे.
गेल्या 24 तासात 4,46,642 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या सरासरी 2.4 लाख दैनंदिन चाचण्यांमध्ये वृद्धी होऊन जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 4.68 लाखांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या.
देशातील 1321 प्रयोगशाळांसह चाचणी प्रयोगशाळेचे जाळे सातत्याने बळकट केले जात आहे.सध्या 907 सरकारी प्रयोगशाळा आणि 414 खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या मध्ये खालील प्रयोगशाळा समाविष्ट आहेत :
- रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 676 : (शासकीय : 412 + खासगी : 264)
- ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 541 (शासकीय : 465 + खासगी : 76)
- सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 104: (शासकीय : 30 + खासगी 74)
वर्धित चाचणी पायाभूत सुविधांमुळे 88 लाख चाचण्यांपासून (1 जुलै 2020) 1.82 कोटी चाचण्यांपर्यंत (30 जुलै 2020) वाढ झाली आहे.
प्रतिदशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या वाढून 13,181 वर पोहोचली आहे.
केंद्र सरकारच्या “चाचणी, मागोवा आणि उपचार” (“टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट”) या धोरणानुसार, देशात मोठ्या प्रमाणात चाचणी केल्याने संपूर्ण देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या दरात घट झाली आहे. सध्या 21 राज्ये / केंद्र शासित प्रदेशात चाचणी केलेल्या लोकांपैकी 10% पेक्षा कमी लोकांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा येत आहे.
कोविड 19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva .
कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642424)
Visitor Counter : 197